Advertisement

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट‌्स‌ला डी. नोव्हो अभिमत विद्यापीठाचा दर्जा

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट‌्स‌ला डी. नोव्हो अभिमत विद्यापीठाचा दर्जा
SHARES

देशातील प्रतिष्ठित कला शिक्षण संस्था सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट‌्ससह दोन संस्थांना केंद्रीय शिक्षण खात्याने डी. नोव्हो अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने याबाबत अधिकृत अधिसूचना जारी केली.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवीन विद्यापीठाचे भूमिपूजन केले. राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर व डिझाइन’ हे विद्यापीठ २०२४-२५ पासून सुरू होईल. शिक्षण व संशोधनात नावीन्यपूर्णता आणणाऱ्या संस्थांना ‘डी. नोव्हो’ श्रेणी दिली जाते.

आता ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर व डिझाइन’ हे राज्य सरकारकडून चालवणारे पहिलेच अभिमत विद्यापीठ असेल.

यावेळी केंद्रीय मंत्री प्रधान म्हणाले की, ‘डी. नोव्हो’ श्रेणी मिळाल्यानंतर विद्यापीठाला जागतिक उत्तमता केंद्र व संशोधन आदींसाठी मार्ग मोकळा होतो. या विद्यापीठात १५०० विद्यार्थ्यांची मर्यादा घालावी, असे आवाहन त्यांनी केले. हे विद्यापीठ केवळ प्रमाणपत्र देणारे असू नये. भारतीय पुरातन वारसा व उत्तमतेचे केंद्र बनावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.हेही वाचा

महाराष्ट्रात 13 ऐतिहासिक शाळा विकसित केल्या जाणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा