पावसामुळे कांद्याचे भाव वधारले, 'हे' आहेत नवे दर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गेल्या आठवड्यात वाशी इथल्या मुंबई एपीएमसीमध्ये कांद्याच्या किमती १०-१२ रुपयांनी वाढल्या आहेत, अशी माहिती टाईम्स ऑफ इंडियानं दिली आहे.

अवकाळी पावसामुळे ही वाढ झाली आहे. पावासामुळे पिकांची कापणी लांबणीवर पडली आहे. या व्यतिरिक्त, यामुळे उत्पादनाच्या पूर्वीच्या साठ्याचे लक्षणीय नुकसान झाले आहे.

बाजार निरीक्षकांचे मत आहे की, सणांच्या दरम्यान कांद्याचे वाढलेले दर कायम राहतील असा अंदाज आहे. भाव २८-३२ रुपये/किलो पर्यंत वाढले आहेत. तर आधी घाऊक बाजारात १८-२० रुपये किलो होते. यामुळे किरकोळ किमती मागील ३०-३५ रुपयांपेक्षा ४०-४५ रुपये किलो झाल्या आहेत.


हेही वाचा : शाळा सुरू झाल्यानंतर बसभाड्यात ३० टक्के वाढ होणार?


दुसरीकडे व्यापाऱ्यांनी असे म्हटले आहे की, चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या जुन्या स्टॉकला झालेल्या नुकसानीमुळे विक्री काही प्रमाणात कमी झाली आहे.

याशिवाय, किरकोळ विक्रेते उत्कृष्ट गुणवत्ता निवडतात. यामुळे पुढील नुकसान झाल्याचं अहवालानुसार एका घाऊक विक्रेत्यानं सांगितलं. दिवाळी सणानंतर किमती कमी होण्याची शक्यता आहबे. पण येत्या काही दिवसात किमती ३५/किलोचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज आहे, ज्यात नवीन कांदे असतील, असं घाऊक विक्रेत्यानं सांगितलं.


हेही वाचा

मुंबईत पेट्रोलचे भाव वधारले; जाणून घ्या आजचे दर

पुढील बातमी
इतर बातम्या