Advertisement

शाळा सुरू झाल्यानंतर बसभाड्यात ३० टक्के वाढ होणार?

स्कूल बस ओनर्स असोसिएशन (एसबीओए)नं सांगितलं की, स्कूल बसचे शुल्क ३०% नी वाढू शकते.

शाळा सुरू झाल्यानंतर बसभाड्यात ३० टक्के वाढ होणार?
SHARES

स्कूल बस ओनर्स असोसिएशन (एसबीओए)नं सांगितलं की, स्कूल बसचे शुल्क ३०% नं वाढू शकते, असं टाइम्स ऑफ इंडियानं म्हटलं आहे. शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थी वाहतुकीची संख्या लक्षात घेऊन ही भाडेवाढ केव्हा लागू करायची यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

अनिल गर्ग यांनी नमूद केलं की प्रत्येक बस मालक आता एकूण क्षमतेच्या फक्त ५०% विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रेवश देत आहे. ज्यामुळे आधीच्या किमतीत वाहतूक करणं आर्थिकदृष्ट्या कठीण आहे. त्यामुळे त्यांना जवळजवळ ३०% शुल्क वाढवणं भाग आहे. यासाठी ते लवकरच शाळांना निवेदन देतील.

सध्या विद्यार्थी बसवाहतुकीचे किमान दर ८०० ते १,००० रुपये आहेत. ३० टक्के भाडेवाढीनंतर ते १,००० ते १,३००वर पोहोचतील. वाहतूकदारांना अस्तित्व टिकवण्यासाठी ही भाडेवाढ अटळ असेल, असे अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघाचे प्रसिद्धीप्रमुख योगेश कांबळे यांनी सांगितले.

डिझेल दरवाढीमुळे देखील स्कूल बसची फी वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. मार्च २०२०मध्ये डिझेल प्रतिलीटर ६८ रुपये होते. सध्या हे दर ९७ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. बस अनुज्ञप्तीची वैधता पूनर्जीवित करण्यासाठी करोनापूर्वी येणारा ६०० रुपयांचा खर्च सध्या दोन हजारांवर पोहोचला आहे.

त्यांनी नमूद केलं की, सध्याच्या एसओपीनुसार त्यांना दररोज दोनदा बस स्वच्छ करणं आवश्यक आहे. त्याशिवाय मास्क आणि सॅनिटायझर पुरवणं विद्यार्थ्यांची काळजी घेणं हे देखील गरजेच आहे. यासर्वामुळे त्यांचा खर्च देखील वाढत आहे.

एकूणच सर्वच क्षेत्रांत दरवाढ झाल्यानं शालेय विद्यार्थी वाहतूकदारांनादेखील वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी वाहतूकदारांना आर्थिक मदत मिळावी, उभ्या असलेल्या शालेय बसना करमाफी आणि पार्किंग दरात सूट मिळावी, आदी या विद्यार्थी वाहतूकदारांच्या मागण्या होत्या. परंतु सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केल्यानं त्याचा फटका पालक आणि विद्यार्थी वर्गाला बसणार आहे.



हेही वाचा

ट्रान्सहार्बर मार्गावरील १६ वातानुकूलित ट्रेनचे वेळापत्रक जाहीर

स्वदेशी बनावटीच्या १० मोनो रेल लवकरच होणार दाखल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा