Advertisement

ट्रान्सहार्बर मार्गावरील १६ वातानुकूलित ट्रेनचे वेळापत्रक जाहीर

मध्य रेल्वे प्रशासनानं या एसी लोकल सेवेच्या फेऱ्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.

ट्रान्सहार्बर मार्गावरील १६ वातानुकूलित ट्रेनचे वेळापत्रक जाहीर
SHARES

मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण या मार्गावर गुरूवार ७ ऑक्टोबरपासून एसी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांना एसी लोकलमुळं गारेगार प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे. या मार्गावर एसी लोकलच्या १६ फेऱ्या होणार असून, याबाबतचे वेळापत्रक मध्य रेल्वे प्रशासनानं प्रसिद्ध केलं आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव व त्यानंतर राज्यभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुंळं ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद ठेवण्यात आली होती. एसी लोकल सेवेसह अनेक सामान्य लोकल सेवाही बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, कालांतरानं कोरोनाचा प्रादुर्भाव व परिस्थिती नियंत्रणात आल्यावर या मार्गावरील सामान्य लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आता एसी लोकल सुरू करण्यात आली आहे.

मध्य रेल्वे प्रशासनानं या एसी लोकल सेवेच्या फेऱ्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळं आता ट्रान्स हार्बर मार्गावरील गारेगार प्रवासाची संधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान, गुरूवारी सकाळी ५ वाजून ४४ मिनिटांनी पहिली लोकल पनवेल ते ठाणे मार्गावर धावली. तसंच, रात्री शेवटची एसी लोकल १० वाजून ४६ मिनिटांनी पनवेल ते ठाणे या मार्गावर धावेल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा