महाराष्ट्रात ३१ जानेवारीपर्यंत निर्बंध कायम

(File Image)
(File Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं जाहीर केलेल्या 'मिशन बिगीन अगेन'ची नियमावली आता ३१ जानेवारी २०२१ पर्यंत कायम ठेवण्यात आली आहे. राज्य सरकारकडून याबाबतचा अधिकृत आदेश प्रसिद्द करण्यात आला आहे. यामध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यातील लॉकडाउन ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवत असल्याची माहिती दिली आहे.

ब्रिटनमध्ये आढळलेल्या नवीन कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण भारतातही आढळले आहेत. महाराष्ट्रातही कोरोनाचं संकट पुन्हा नव्याने निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकारकडून काळजी घेतली जात आहे. यामुळेच राज्यात ३१ जानेवारीपर्यंत मिशन बिगीन अगेन लागू राहील असं राज्य सरकारने जाहीर केलं आहे.

याआधी ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गत निर्बंध शिथील करत प्रसिद्ध करण्यात आलेल्या गाईडलाइन्स ३१ जानेवारीपर्यंत लागू राहतील असं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. या नियमांची काटेकोरपणे अमलबजावणी करावी लागणार आहे. यासोबतच याआधी परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रणामे सुरु राहणार आहेत.


हेही वाचा -

मुंबईच्या वेशीवर दोन महिन्यांनंतर फास्टॅग बंधनकारक

फायर बाईकसाठी पालिकेची निविदा, निमुळत्या जागेसाठी सोईस्कर

कोरोनाशी लढण्यासाठी पालिकेला हवेत ४०० कोटी


पुढील बातमी
इतर बातम्या