Advertisement

कोरोनाशी लढण्यासाठी पालिकेला हवेत ४०० कोटी

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं ४०० कोटींच्या निधीची मागणी करण्यासाठी स्थायी समितीला प्रस्ताव पाठवला आहे.

कोरोनाशी लढण्यासाठी पालिकेला हवेत ४०० कोटी
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं ४०० कोटींच्या निधीची मागणी करण्यासाठी स्थायी समितीला प्रस्ताव पाठवला आहे. मार्च २०२१ पर्यंत निधी द्यावा असं या प्रस्तावात म्हटलं आहे.

वृत्तानुसार, कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेनं यापूर्वीच १ हजार ६३२ कोटी रुपये खर्च केले आहेत. आकस्मिकता निधीमध्ये सध्या २९ कोटी रुपये शिल्लक आहेत.

महापालिकेनं आतापर्यंत सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटर स्थापित करण्यासाठी जास्तीत जास्त ४५३.११ कोटी खर्च केले आहेत. जंबो सुविधा तयार करण्यासाठी आणि देखभाल करण्यासाठी आणखी २१३.०८ कोटी रुपये खर्च केले आहेत.

आकडेवारीनुसार, १ एप्रिल २०२० पर्यंत, नागरी संस्थेला आकस्मिकता निधी प्राप्त झाला होता. ८५२ कोटी आणि संपूर्ण रक्कम कोरोना विरोधात लढण्यासाठी उपयोगात आणली गेली. नंतर, निधी कमी पडू नये यासाठी, महापालिकेनं स्वतःच्या बजेटमधून ३०० कोटींची तरतूद केली.

राज्य सरकारकडे ६० कोटी मागितले. या व्यतिरिक्त, ऑगस्टमध्ये, पालिकेनं आपले बजेट कमी केले आणि आकस्मिक निधीचा बॅकअप म्हणून देशभरातून १ हजार ६६२ कोटी जमा केले.

नुकतेच स्थायी समितीनं अन्न पॅकेटवरील खर्चांवर प्रश्न उपस्थित केला होता. जो की १०० कोटींपेक्षा जास्त होता. सदस्यांनी स्पष्टीकरण मागितलं होतं तसंच ऑडिट करण्यास सांगितलं होतं. त्यामुळे येत्या कोरोना काळात करण्यात येणाऱ्या खर्चावरून प्रशासन आणि नरसेवकांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

महाराष्ट्रातील 'या' १२ शहर आणि जिल्ह्यांमधून कोरोनाच्या रुग्णांमध्ये होतेय घट

मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी बीएमसी घेणार आधुनिक यंत्रे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा