Advertisement

मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी बीएमसी घेणार आधुनिक यंत्रे

मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी आधुनिक पद्धतीचे यंत्रे घेण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या यंत्रांसाठी ५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी बीएमसी घेणार आधुनिक यंत्रे
SHARES

मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी आधुनिक पद्धतीचे यंत्रे घेण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या यंत्रांसाठी ५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मिठी नदीतील गाळसफाईसाठी पालिकेने आतापर्यंत कित्येक कोटी रुपयांचा खर्च केला आहे. 

आता गाळ काढण्यासाठी अत्याधुनिक पध्दतीचे शिल्ट पुशर अँड ट्रक्सॉर मशीनची खरेदी करण्यात येणार आहे. या शिल्ट पुशर मशीनद्वारे नदीमधील तरंगत असलेला कचरा आणि पानवेलीची झाडे काढली जातात. मात्र, त्या आधारे नदीतील तळाकडील गाळ काढला जाणार का असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

मिठी नदीच्या साफसफाईचे काम २०१६-१७ पासून महापालिकेने हाती घेतलं आहे. मात्र आजवर करण्यात येणाऱ्या मिठी नदीच्या परंपरागत साफसफाईच्या तुलनेत पुढील मोठे नालेसफाई व मिठी नदीचा गाळ अत्याधुनिक शिल्ट पुशर यंत्राद्वारे काढण्याचा विचार सुरु आहे. त्यासाठी नव्याने काढण्यात येणाऱ्या कंत्राट कामांमध्ये या यंत्राचा समावेश करण्यात येणार आहे. 

या यंत्राच्या आधारे नदीच्या काठावर गाळ जमा केला जाणार असून त्यानंतर तो इतर पोकलेनच्या मदतीने उचलावा लागणार आहे. यंत्राची खरेदी कंत्राटदारांनी करून त्याचे भाडे त्यांना देण्यासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित मानला जात आहे.



हेही वाचा -

कोरोनाबाधितांसाठी आरोग्य व्यवस्था उभारण्याकरिता महापालिकेला आतापर्यंत १,४७० कोटींचा खर्च

'फ्री' काश्मिर प्रकारणात पोलिसांकडून ‘सी’ समरी अहवाल सादर



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा