Advertisement

महाराष्ट्रातील 'या' १२ शहर आणि जिल्ह्यांमधून कोरोनाच्या रुग्णांमध्ये होतेय घट

सोमवारी महाराष्ट्रातील १२ शहरांमध्ये ५ किंवा सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रातील 'या' १२ शहर आणि जिल्ह्यांमधून कोरोनाच्या रुग्णांमध्ये होतेय घट
SHARES

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होताना दिसत आहे. सोमवारी महाराष्ट्रातील १२ शहरांमध्ये ५ किंवा सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या२४ दिवसांपासून दररोज ५००० रुग्णांची नोंद केली जात होती. पण आताचा आकडा नक्कीच दिलासादायक आहे.

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीतील पाच, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, परभणी, अमरावतीमधील चार प्रकरणे नोंदवली गेली. धुळे आणि वाशिममधील तीन प्रकरणं, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव इथं दोन आणि सांगलीतील एक प्रकरणं नोंदवली गेली.

यापूर्वी २८ नोव्हेंबर रोजी गडचिरोलीत ३१ रुग्ण, सिंधुदुर्ग १७, रत्नागिरी ७, परभणी ६, अमरावती २०, धुळे ३, वाशिम ५, उल्हासनगर २८, भिवंडी निजामपुर १४, मालेगाव ८ आणि सांगलीत ५ रुग्णांची नोंद झाली होती. २८ ऑक्टोबर रोजी गडचिरोलीत १२२, सिंधुदुर्गात ४०, रत्नागिरीमध्ये १६, परभणीमध्ये २६, धुळ्यात ८, वाशिममधील २७, उल्हासनगरातील २७, भिवंडी-निजामपूरमध्ये १४, मालेगावमध्ये २ आणि सांगलीत २९ रुग्ण आढळले होते.

राज्यातील परिस्थिती सुधारत असली तरी सरकारनं सर्व नागरिकांना संसर्गजन्य रोगाचा प्रसार रोखण्यासाठी सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. शिवाय, लोकांना सामाजिक अंतर कायम राखण्यासाठी, मास्क घालण्यास, हँड सॅनिटायझर्स वापरण्यास आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, कोविडचा नवीन स्ट्रेन यूकेमध्ये वेगानं पसरत आहे. २१ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमानतळांवर प्रवाशांच्या तपासणी आणि चाचणी घेण्यात आल्या आहेत. राज्यात आतापर्यंत १ हजार १२२ प्रवाशांची चाचणी घेण्यात आली आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील यूकेमधून परत आलेल्या १६ प्रवाशांची सकारात्मक चाचणी आली आहे. या प्रवाशांपैकी नागपूरचे चार, मुंबई आणि ठाण्याचे तीन, पुण्याचे दोन आणि नांदेड, अहमदनगर, रायगड आणि औरंगाबाद इथले प्रत्येकी १ प्रवासी आहेत.

सोमवारी, 28 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचे २ हजार ४९८ रुग्ण नोंदवली गेली. यामुळे राज्यातील कोविड १९ च्या रुग्णांची १९ लाख २२ हजार ०४८ रुग्णांवर पोहचली. सध्या राज्यात ५७ हजार १५९ सक्रिय रुग्ण आहेत.



हेही वाचा

२५ नोव्हेंबरनंतर इंग्लडहून आलेल्यांनी त्वरित संपर्क साधा, नवी मुंबई पालिकेचं आवाहन

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ३७४ दिवसांवर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा