मुंबईतील कोरोना आता नियंत्रणात आल्याचं दिसून येत आहे. रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा दर कमी झाला असून रुग्ण दुपटीचा कालावधीही ३७४ दिवसांवर गेला आहे. त्यामुळे पालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.२१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. रोज आढळणाऱ्या रुग्णांमध्ये लक्षणेविरहित रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन ५५७ रुग्ण आढळले. तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा २ लाख ९१ हजारांवर गेला आहे. सोमवारी एका दिवसात ७२० रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत २ लाख ७१ हजारांहून अधिक म्हणजेच ९३ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत सध्या ८१७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मुंबईत दररोज सरासरी १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. आतापर्यंत २३ लाख ११ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण चाचण्यांपैकी बाधित रुग्णांचे प्रमाण १३ टक्क्यांच्या खाली गेले आहे. मुंबईत आतापर्यंत ११ हजार ८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाबाधितांसाठी आरोग्य व्यवस्था उभारण्याकरिता महापालिकेला आतापर्यंत १,४७० कोटींचा खर्च
'फ्री' काश्मिर प्रकारणात पोलिसांकडून ‘सी’ समरी अहवाल सादर