राज्यातील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता, दोन दिवसात निर्णय

(Representational Image)
(Representational Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यभरात कोरोनाचे रुग्ण (Coronavirus) कमी होऊ लागल्यानं राज्य पुन्हा एकदा अनलॉकच्या दिशेनं वाटचाल करू लागले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत अनेक निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

याचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी यांच्यामध्ये बैठका पार पडल्या आहेत. यावर आता लवकरच मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार आहेत

'हे' निर्बंध शिथिल होण्याची शक्यता

१) चित्रपटगृहे , मॉल्स आणि इतर ठिकाणी प्रवेश देताना लसीचे दोन डोस बंधनकारक करण्यात आले आहेत. यात शिथिलता मिळण्याची दाट शक्यता आहे.

२) रेल्वे किंवा बसनं प्रवास करताना लसीचे दोन डोस बंधनकारक केले आहेत. त्यामध्ये ही शिथिलता मिळण्याची दाट शक्यता आहे.

३) राज्यातील ब्युटी सलून आणि केश कर्तनालय पूर्ण क्षमतेनं चालवण्यास परवानगी द्यायची शक्यता

४) मनोरंजन आणि उद्यानं जलतरण तलाव, वॉटर पार्क यांनाही पूर्ण क्षमतेनं सुरू ठेवण्याच्या परवानगी देण्याची शक्यता

५) सध्या नाट्यगृह चित्रपटगृह ५० टक्के क्षमतेने सुरू आहेत तेही पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची शक्यता

६) हॉटेल, रेस्टॉरंट, उपहारगृह यांनाही पूर्ण क्षमतेनं आणि नियमित वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी देण्याची शक्यता आहे

ज्यांचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत. त्यांनाच प्रवेश देण्याच्यावरून मुंबई उच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला फटकारले आहे. त्यानंतर आता राज्य सरकार तातडीनं यावर ती निर्णय घेण्याची शक्यता आहे.


हेही वाचा

शिवाजी पार्क मैदानातील 'तो' रस्ता वादाच्या भोवऱ्यात

ठाणे-दिवा रेल्वेमार्गिका : मुंबईकरांना होणार 'हे' ५ फायदे

पुढील बातमी
इतर बातम्या