TET, BLO ड्युटीसह विविध मागण्यांसाठी शिक्षक रस्त्यावर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महाराष्ट्रातील विविध शिक्षक संघटनांनी 9 जुलैला राज्यभर 'शाळा बंद' आंदोलन पुकारले आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (TET) नियमांमध्ये शिथिलता, मतदार यादीच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) अंतर्गत लावण्यात आलेली बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) ड्युटी रद्द करणे, तसेच पदोन्नती आणि शिक्षक भरतीसंदर्भातील धोरणांमध्ये बदल करणे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

शिक्षक संघटनांच्या संयुक्त कृती समितीने या आंदोलनाची हाक दिली आहे. संघटनांचे म्हणणे आहे की, निवडणुकीशी संबंधित कामांमुळे शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा ताण वाढत असून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर होत आहे.

शिक्षकांच्या प्रमुख मागण्या

  • 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना TET सक्तीमधून सूट द्यावी.

  • SIR अंतर्गत शिक्षकांवर सोपवण्यात आलेली BLO ड्युटी तात्काळ रद्द करावी.

  • सुरू असलेली पदोन्नती प्रक्रिया तात्पुरती स्थगित करावी.

  • शिक्षकांची कमतरता वाढेल, असा दावा करत कर्मचारी मान्यता (स्टाफिंग) धोरण मागे घ्यावे.

शिक्षण विभागाचा इशारा

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळा नियमित सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा पगार कापण्यात येईल, असा इशाराही विभागाने दिला आहे.

मात्र, या इशाऱ्यानंतरही शिक्षक संघटनांनी आंदोलन नियोजनानुसारच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आज राज्यातील अनेक भागांमध्ये शाळांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा

MPSC परीक्षा आता वर्षातून 3 वेळा होणार

पुढील बातमी
इतर बातम्या