महाराष्ट्राला लसीकरण पूर्ण करण्यासाठी लागू शकतो १ वर्षाचा कालावधी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लसीकरण केलं जात आहे. पण सध्या लसीकरणाचा वेग पाहता संपूर्ण महाराष्ट्राला दोन्ही लस मिळण्यासाठी १ वर्षाचा कालावधी लागू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात येण्याची शक्यता वर्तवली आहे.

ताज्या अहवालानुसार, असं दिसून आलं आहे की संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लसीकरण करण्यासाठी सध्याच्या लसीकरण मोहिमेची गती लक्षात घेता सुमारे ११ महिन्यांहून अधिक महिने लागतील.

एका विश्लेषणामध्ये, TOI नं असं उघड केलं आहे की जर डिसेंबरपर्यंत आपल्या प्रौढ लोकसंख्येला पूर्णपणे लसीकरण करायचे असेल तर राज्याला दररोज १० लाखांहून अधिक लोकांना लसीकरण करावं लागेल.

तथापि, तज्ञांनी नमूद केलं की केंद्राचा पुरवठा, जो आतापर्यंत राज्याच्या मागणीशी असमान आहे, ते लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कधीही पुरेसे होणार नाही.

राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राची प्रौढ लोकसंख्या ९.५८ कोटी आहे. याचा अर्थ राज्याला संपूर्ण लसीकरण करण्यासाठी १९.१६ कोटी लसींची आवश्यकता आहे.

राज्यानं आतापर्यंत ५.७१ कोटी डोस दिले आहेत आणि १३ कोटींपेक्षा जास्त डोसची गरज आहे. केंद्र दर महिन्याला १.१५ कोटी ते १.२ कोटी डोस महाराष्ट्राला देतं.

सप्टेंबरमध्ये, महाराष्ट्राला थोड्या अधिक १,७ कोटी डोसचं आश्वासन दिलं गेलं आहे. असं असूनही, राज्य त्याच्या अर्ध्या लोकसंख्येच्या अगदी पूर्ण लसीकरणाच्या जवळपास कुठेही जाणार नाही.

म्हणून, तज्ञांनी खासगी ठिकाणी लसीकरण करण्याची शिफारस केली होती. यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, लस उत्पादकांची उत्पादन क्षमता वाढली असली तरी उत्पादकांकडून थेट लस खरेदी करणे याचा सरकारला पर्याय नाही. शिवाय, टोपे यांनी मान्य केलं की राज्याला दिलेला कोटा डिसेंबरचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पुरेसा नाही.


हेही वाचा

नवी मुंबईत ८० टक्के खाटा रिकाम्या

कोरोना रुग्णांच्या संपर्कातील सगळ्यांच्या तात्काळ चाचण्या होणार

पुढील बातमी
इतर बातम्या