दांडिया खेळताना मुलाचा मृत्यू, धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुलुंडनंतर आता विरारमध्ये (Virar ) दांडीया (Dandiya ) खेळताना मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूच्या धक्याने वडिलांना देखील हृदय विकाराचा झटका आला. त्यात त्यांचाही मृत्यी झाला. मनीषकुमार जैन असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर नरपत जैन असं मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या पित्याचे नाव आहे.

दांडिया खेळत असाताना शनिवार रात्री 35 वर्षीय मनीषकुमार जैन या तरुणाचा हृदयविकाराचा झटक्याने ( Heart Attack) मृत्यू झाला. डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या वडिलांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि पिता पुत्रांचे रुग्णालयातच निधन झालं.

विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथील एव्हरशाईन अवेन्यू या इमारतीमध्ये नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. शनिवारी रात्री दांडिया सुरू असताना मनीषकुमार जैन या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला. त्याचे वडील नरपत जैन यांनी नागरिकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले.

मात्र रिक्षामध्येच मनीषकुमारचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्याचे बघताच त्याचे वडील नरपत जैन यांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जैन कुटुंबियांचा सोन्याचे दागिने खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. मयत मनीष जैन ज्याचे तीन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. मनिष वडिलांच्या व्यवसायात मदत करत होता.

गुजरातमधील आनंद परिसरातील तारापूर या ठिकाणच्या 21 वर्षाच्या युवकाचा गरबा खेळताना मृत्यू झाला. गरबा खेळताना हा युवक अचानक बेशुद्ध पडला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पम तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं.

वाशिमधील कारंजा गावात गरबा खेळताना दोन दिवसात दोघांचा मृत्यू झाला आहे. 30 सप्टेंबर मध्ये गोपाळ इन्नानी यांचा गरबा खेळताना मृत्यू झाला. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी 25 वर्षीय सुशील काळे यांचा मृत्यू झाला.


हेही वाचा

गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन तरुणाचा मृत्यू

पुढील बातमी
इतर बातम्या