Advertisement

गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन तरुणाचा मृत्यू

मुंबई पूर्व उपनगरातील मुलुंडमध्ये गरबा खेळताना दुर्दैवी घटना घडली.

गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन तरुणाचा मृत्यू
SHARES

मुंबई पूर्व उपनगरातील मुलुंडमध्ये (Mulund) गरबा (Garba) खेळताना दुर्दैवी घटना घडली. गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मुलुंडमधील कालिदास नाट्यगृह इथे भाजपतर्फे (BJP) आयोजित प्रेरणा रासमध्ये ही घटना घडली आहे.

ऋषभ लहरी मंगे भानुशाली असं मृत 27 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो डोंबिवलीचा रहिवासी होता. ऋषभ लहरी मंगे भानुशाली याने एमबीएचे शिक्षण घेतले होते. बोरिवलीतील एका खासगी कंपनीत ऋषभ कामाला होता.

डोंबिवली पश्चिममध्ये तो आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. घरातला एकटा कमवणारा व्यक्ती होता. पण काळाने घाला घातल्याने त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

भाजप नेते मनोज कोटक आयोजित गरबा खेळण्यासाठी तो आला होता. परंतु गरबा खेळत असतानाच त्याच्या छातीत दुखू लागलं. अॅसिडिटी झाल्याचं समजून कुटुंबियांनी त्याला थंड पेय पिण्यास दिलं. परंतु तरीही वेदना कमी न झाल्याने उपस्थितांच्या मदतीने त्याला तातडीने मुलुंडच्या आदिती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित केलं.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा