'केईएम'ला डॉ. आनंदीबाई जोशींचं नाव द्या, मनसेची मागणी

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

परळमधील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालय अर्थात केईएम रुग्णालयाचं नाव बदलून डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालय करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई महापालिकेकडे केली आहे. डॉ. जोशी या पहिल्या भारतीय डॉक्टर असल्याने त्यांच्या वैद्यकीय योगदानाचा गौरव करण्यात यावा, अशी मागणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

प्रेरणादायी कामगिरी

ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून देश मुक्त होऊन आजमितीस ७ दशके पूर्ण झाली. तरिही अनेक वास्तूंना ब्रिटीशांची नावं आहेत. डॉ. आनंदीबाई जोशी वयाच्या १८ व्या वर्षी उच्च शिक्षणासाठी परदेशात गेल्या. तिथं प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला.

दखल घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाला जोशी यांचं नाव दिल्यास त्यांच्या वैद्यकीय योगदानाचा उचित गौरव होईल. हे नामांतर भारतीय युवकांना कायम प्रेरणादायी ठरेल. त्यामुळे या मागणीची योग्य दखल घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रीया करावी, असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. या निवेदनावर मनसे नेता नितीन सरदेसाई, सरचिटणीस मनोज चव्हाण आणि संदीप देशपांडे यांची स्वाक्षरी आहे.


हेही वाचा-

कांदिवलीतला 'ढोकळा’वाला नरमला, मनसेच्या आंदोलनाचा दणका

मनसेशी युती? शक्यच नाही! - संजय निरुपम


पुढील बातमी
इतर बातम्या