ठाणे (thane) जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सुरू केलेल्या मोबाईल कर्करोग (cancer) निदान उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
कर्करोग निदान व्हॅन अल्पावधीतच हजारो लोकांपर्यंत पोहोचली आहे. ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि सीईओ मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेली ही मोहीम 3 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2025 पर्यंत चालली.
या कालावधीत 5,143 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली, त्यापैकी 53 व्यक्तींना कर्करोगाचे संशयित रुग्ण म्हणून निदर्शनास आले.
या मोहिमेचा मुख्य उद्देश कर्करोगाचे लवकर निदान करणे, त्वरित उपचार करणे, कर्करोगाबाबत मार्गदर्शन प्रदान करणे आणि जनजागृती वाढवणे हा आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, वेळेवर निदान केल्याने उपचारांच्या परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा होते, त्यामुळे या उपक्रमाचे खूप महत्त्व आहे.
विविध गावांमध्ये फिरणाऱ्या मोबाईल व्हॅनद्वारे मोफत कर्करोग तपासणी करण्यात आली.
या तपासणीत तीन प्रमुख प्रकारच्या कर्करोगावर लक्ष केंद्रित करण्यात आले. यात तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग इत्यादींचा समावेश आहे.
या व्हॅनद्वारे (mobile van) ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी (bhiwandi), अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या पाच तालुक्यात मोहीम राबवली गेली
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर पारगे यांच्या मते, हा उपक्रम अल्पावधीतच मोठ्या संख्येने नागरिकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचला.
तसेच या प्रयत्नातून नागरिकांना मोफत तपासणीची सुविधा मिळाली.
कर्करोगाच्या तपासणीचे आकडे (3 ते 29 नोव्हेंबर 2025)
तोंडाच्या कर्करोगाची तपासणी: 2,441 नागरिक
स्तनाच्या कर्करोगाची तपासणी: 1,492 महिला
गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाची तपासणी: 1,210 महिला
एकूण तपासणी: 5,143 नागरिक
संशयित प्रकरणे:
तोंडाच्या कर्करोगाचे 5 संशयित रुग्ण
स्तनाच्या कर्करोगाचे 34 संशयित रुग्ण
गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाचे 14 संशयित रुग्ण
एकूण संशयित रुग्ण : 53
यापैकी 8 व्यक्तींचे नमुने पुढील चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
हेही वाचा