महाराष्ट्रातील (maharashtra) ठाणे (thane) जिल्ह्यातील मुंबई लोकल (mumbai local) ट्रेनच्या महिला डब्यात एका प्रवाशाच्या मोबाईल फोनचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली, असे एका महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. यामुळे प्रवाशांमध्ये (passangers) काही वेळ गोंधळ उडाला होता.
सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी रात्री 8.12 वाजता कळवा (kalwa स्थानकावर सीएसएमटी - कल्याण उपनगरीय ट्रेनमध्ये घडलेल्या या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी म्हणाले की, स्फोटामुळे धूर झाला आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक यंत्रांचा वापर केला.
दरम्यान, एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, एक लहानसा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला, ज्यामुळे डब्यात धूर आला आणि अनेक प्रवासी खाली उतरण्यासाठी दाराकडे धावले. तसेच रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
"ज्या महिलेचा मोबाईल फोन स्फोट (mobile phone explosion) झाला तिची ओळख अद्याप कळू शकलेली नाही. ही घटना बॅटरी बिघाडामुळे किंवा इतर काही तांत्रिक समस्या असू शकते. सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरताना प्रवाशांनी सावधगिरी बाळगली पाहिजे," असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
या घटनेनंतर रेल्वे सेवांवर कोणताही परिणाम झाला नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा