नॅशनल पार्कमधील प्रस्तावित दर वाढीला स्थगिती

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र वन विभागाने संजय गांधी नॅशनल पार्क Sanjay Gandhi National Park (SGNP) मधील वार्षिक पास दरात प्रस्तावित मोठी वाढ सध्या स्थगित केली आहे.

वन विभागाने सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी वार्षिक पास 348 वरून थेट 10,000 करण्याचा प्रस्ताव मांडला होता. म्हणजेच तब्बल 2,500 टक्क्यांहून अधिक वाढ. हा निर्णय 1 मेपासून लागू होणार होता. मात्र तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने हा प्रस्ताव मागे घेण्यात आला आहे.

SGNPच्या संचालिका अनिता पाटील (Anita Patil) यांनी सांगितले की, प्रस्तावित दर खूप जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर तो थांबवण्यात आला असून आता नव्याने दर निश्चित केले जाणार आहेत.

नॅशनल पार्कच्या प्रशासनाने 1 मेपासून  मॉर्निग  वॉकसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात अचानक आणि अवाजवी वाढ केली आहे. यामुळे मुंबईतील नागरिक आणि निसर्गप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती.

पूर्वी सर्वसामान्य नागरिकांसाठी वार्षिक पास 383 रुपये असायचा. पण आता हा पास वार्षिक 10 हजार रुपये एवढा करण्यात आला आहे. तर  ज्येष्ठ नागरिकांसाठी वार्षिक 45 रुपये इतक्या अल्प दरात उपलब्ध असलेल्या मॉर्निंग वॉकची सुविधा 5 हजार रुपये  करण्यात आली आहे. याचाच अर्थ ज्येष्ठ नागरिकांसाठी सुमारे 11,000 टक्क्यांहून अधिक तर इतरांसाठी 2,500 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

उद्यानाचे वनसंरक्षक आणि संचालक राहुल गवई यांनी  पत्रक जारी करत या अवाढव्य शुल्कवाढीची घोषणा केली होती. या पत्रात दरवाढीचे समर्थन करताना उद्यानातील सुरक्षा, स्वच्छता आणि वनसंपदेचे संवर्धन करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे म्हटले होते.

सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या दरात उपलब्ध असलेली ही सुविधा आता आवाक्याबाहेर गेली आहे. सर्वसामान्यांकडून इतके शुल्क वसूल करणे म्हणजे मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे, अशा शब्दांत मुंबईकर या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करत आहेत.


हेही वाचा

BKC–वाकोला मार्ग लवकरच खुला होणार

पुढील बातमी
इतर बातम्या