
मुंबईतील बहुप्रतिक्षित सांताक्रूझ–चेंबूर लिंक रोड (SCLR) प्रकल्प आता पूर्णत्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. MMRDA कडून Mumbai Metropolitan Region Development Authority महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. वाकोला नाल्यावर दोन कॉम्पोझिट गर्डर बसवून BKC–वाकोला मार्गाची संरचना पूर्ण झाली आहे.
हा मार्ग Bandra Kurla Complex (BKC) ला वाकोला परिसराशी जोडतो आणि SCLR च्या दुसऱ्या टप्प्याचा भाग आहे. 2016 पासून सुरू असलेल्या या प्रकल्पातील हा छोटा पण अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो.
MMRDAच्या माहितीनुसार, हा मार्ग प्रत्यक्ष वाहतुकीसाठी खुला होण्यासाठी अजून सुमारे तीन महिने लागू शकतात. एकूण SCLR कॉरिडॉर 10.88 किमी लांबीचा असून, वाकोला–BKC हा भाग 1.4 किमीचा आहे. यात 500 मीटरचा चार लेन उंच रस्ता आणि 900 मीटरचे दोन लेन कनेक्टिंग मार्ग समाविष्ट आहेत.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईत पूर्व–पश्चिम प्रवास अधिक सुलभ होणार आहे. इर्स्टन एक्स्प्रेस हाय वे (Eastern Express Highway) आणि वेर्स्टन एक्स्प्रेस वे (Western Express Highway) यांना सिग्नल-फ्री जोडणी मिळणार असल्याने वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः BKC परिसरात ये-जा करणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, या प्रकल्पामुळे व्यावसायिक आणि निवासी भागांदरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सुरळीत होईल. BKC परिसरातील इन्ट्री आणि एस्जिटच्या ठिकाणी होणारी गर्दी कमी होण्याची शक्यता आहे.
एकूणच, SCLR प्रकल्प मुंबईच्या रस्ते नेटवर्कमध्ये महत्त्वाची भर घालणार असून, शहरातील वाहतूक व्यवस्थेला अधिक कार्यक्षम बनवण्याच्या दिशेने हा मोठा टप्पा मानला जात आहे.
हेही वाचा
