मुंबई महानगरपालिकेने (brihanmumbai municipal corporation) मुलुंड (mulund) बर्डपार्कच्या निविदेला दुसरी मुदतवाढ दिल्याने कामाला विलंब होणार आहे.
त्यामुळे वारंवार मुदतवाढ दिल्याची चौकशी करण्याची मागणी आमदार मिहिर कोटेचा यांनी महापालिका (bmc) आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांना पत्र लिहून केली.
तसेच बिल्डिंग मेंटेनन्सचे मुख्य अभियंता जाणूनबुजून निविदा प्रक्रिया रखडवत आहेत. तसेच काही कलंकित कंपन्यांना फायदा व्हावा यासाठी वारंवार मुदतवाढ देत आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
मुलुंड बर्डपार्कची (bird park) निविदा सुरुवातीला 29 ऑगस्ट 2025 रोजी काढण्यात आली होती. 19 सप्टेंबर 2025 ही अंतिम मुदत होती. 10 सप्टेंबर रोजी निविदापूर्व बैठक घेण्यात आली होती आणि त्यात नऊ निविदाधारकांनी भाग घेतला होता.
ही अंतिम मुदत दोनदा वाढवण्यात आली आहे. पहिली 3 ऑक्टोबर आणि दुसरी 17 ऑक्टोबरला मुदतवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जवळजवळ एक महिना निविदा प्रक्रिया लांबविली गेली आहे.
निविदापूर्व बैठकीला चार आठवड्यांहून अधिक काळ होऊनही निविदाकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना कोणतेही लेखी उत्तर देण्यात आलेले नाही. तसेच बैठकीचे इतिवृत्त तयार करण्यात आलेले नाही. त्यामुळे वारंवार मुदतवाढ ही अनुचित आहे.
हेही वाचा