चेंबूरमधील झाड कोसळून 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) चौकशी अहवालावर आता टीका होत आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी हा अहवाल फेटाळून लावत, या दुर्घटनेसाठी जबाबदार अधिकाऱ्यांना क्लीन चिट देण्यात आल्याचा आरोप केला आहे.
30 जून रोजी चेंबूर (पश्चिम) येथे पिंपळाचे झाड शाळेच्या बसवर कोसळल्याने 11 वर्षीय विहान श्रीवास्तव याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी अंतर्गत चौकशी समिती नेमली होती.
समितीच्या अहवालानुसार, या प्रकरणात बीएमसीच्या उद्यान (Garden) आणि रस्ते विभागाला कोणताही दोष नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, संबंधित प्रकल्पातील कंत्राटदार आणि सल्लागार (Consultant) यांच्यावर एकूण 7 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणात कोणत्याही महापालिका अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली नाही.
यावर प्रतिक्रिया देताना अमित साटम यांनी हा अहवाल म्हणजे अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. "जर कामात त्रुटी होत्या, तर त्या कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का करण्यात आली नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच, विहान श्रीवास्तवच्या मृत्यूप्रकरणी जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी साटम यांनी केली आहे.
हेही वाचा