मध्य रेल्वे (central railway) आपल्या मुंबई (mumbai) उपनगरीय नेटवर्कवरील 43 स्थानकांवर 'आपत्कालीन वैद्यकीय कक्ष' (Emergency medical rooms) सुरू करणार आहे.
या सुविधांसाठी ई-लिलाव प्रक्रिया 18 ते 23 सप्टेंबर या कालावधीत नियोजित आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे नवीन ईएमआर टप्प्याटप्प्याने सुरू केले जातील.
सध्या मुंबई उपनगरीय विभागात केवळ 12 ईएमआर कार्यरत आहेत. धावत्या लोकल ट्रेनमधून पडून होणाऱ्या अपघातांबाबतच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हा विस्तार केला जात आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार, त्यांच्या नेटवर्कवर अशा घटनांमध्ये होणारे मृत्यू आणि दुखापतींचे प्रमाण 250 टक्क्यांनी वाढले आहे.
प्रस्तावित ईएमआरद्वारे अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना त्वरित प्रथमोपचार दिले जातील. ज्यांना पुढील उपचारांची गरज असेल त्यांना रुग्णालयात हलवले जाईल.
तसेच याचा उद्देश अपघात आणि वैद्यकीय उपचार सुरू होण्यामधील अत्यंत महत्त्वाचा वेळ कमी करणे हा आहे.
उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेतील निर्देशांनुसार हा विस्तार केला जात असल्याचे रेल्वेने सांगितले.
कल्याण, भायखळा (byculla) आणि वाशी येथील तीन ईएमआरचे व्यवस्थापन सध्या मध्य रेल्वेचा वैद्यकीय विभाग करतो.
1 ऑगस्ट 2022 ते 31 जुलै 2027 या कालावधीसाठी असलेल्या एका करारानुसार, ठाण्यातील 'ॲनी फाउंडेशन' (Annie Foundation) या केंद्रांवर सेवा पुरवत आहे.
कर्जत, कुर्ला, टिटवाळा, लोकमान्य टिळक टर्मिनस, घाटकोपर, ठाणे, भांडुप, कांजूरमार्ग आणि डोंबिवली येथील इतर नऊ ईएमआरचे व्यवस्थापन वाणिज्य विभागामार्फत केले जाते.
चेंबूर आणि मानखुर्द येथील ईएमआरसाठी औषध-परवाना (drug-licence) संबंधित प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे. खोपोली येथे पावसाळ्यानंतर बांधकामाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आणि त्यानंतर ही सुविधा कार्यान्वित केली जाईल.
हेही वाचा