मुंबईतील (mumbai) चेंबूर (chembur) स्थानकाजवळ अनेक भाविक (devotees) रेल्वे रुळांवर श्रावण (shravan) पूजा करताना आढळले. प्रवाशांच्या तक्रारीनंतर, रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) हस्तक्षेप करून भाविकांना रेल्वे रुळांच्या आवारातून बाहेर काढले.
सुरुवातीला, पूजा करत असल्याचा फोटो व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामध्ये लोक रेल्वे (railway) रुळांवर फुले आणि नारळ अर्पण करताना दिसली. चेतन कांबळे यांनी हा व्हिडिओ ट्विटवर शेअर केला. नंतर, तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला.
या ट्विटमध्ये चेतन कांबळे यांनी मध्य रेल्वेला टॅग करत असे म्हटले आहे की, चेंबूर रेल्वे ट्रॅकवर चालणाऱ्या प्रथा चिंताजनक आहेत. यामुळे सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे प्रकार रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी कठोर नियम लागू केले पाहिजेत.
या ट्विटच्या प्रतिसादात आरपीएफ मुंबई (mumbai) विभागाने प्रकारावर आवश्यक कारवाई केली असे ट्विट केले.
ते ट्विटमध्ये म्हणाले ही घटना 30 जुलै 2024 रोजी दुपारी 1:00 वाजता घडली. चेंबूर स्थानकाच्या रेल्वे ट्रॅकवर लोक पूजा करत असल्याची माहिती त्यांना मिळाली. तसेच चेंबूर येथे तैनात कॉन्स्टेबल आशुतोष सिंग, जीआरपी वडाळ्यातील कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि भाविकांना रेल्वे रुळावरून बाहेर जाण्यास सांगितले.
हेही वाचा