महत्त्वाचे म्हणजे, पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्यांची एकूण संख्या 1,414 इतकीच राहणार आहे. सहा नवीन सेवा सुरू करण्यात आल्या असून, सहा जुन्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत.
अप मार्गावर 2 सेवा :
वांद्रे–चर्चगेट: वांद्रेहून सकाळी 11:58 वाजता सुटून 12:30 वाजता चर्चगेटला पोहोचेल.
विरार–बोरिवली: रात्री 11:51 वाजता विरारहून सुटून 12:26 वाजता बोरिवलीला पोहोचेल.
डाऊन मार्गावर 4 सेवा :
भाईंदर–विरार: सकाळी 7:46 → 8:12
बोरिवली–भाईंदर: रात्री 10:14 → 10:30
बोरिवली–विरार: रात्री 10:51 → 11:33
91017 बोरिवली–भाईंदर: मध्यरात्री 12:28 → 12:46
विशेष म्हणजे, रात्री उशिरा आणि पहाटेच्या वेळेतही प्रवाशांना अतिरिक्त पर्याय मिळणार आहेत.
अप :
94138 (AC)
90540 बोरिवली–चर्चगेट
डाऊन :
94137 (AC) चर्चगेट–बोरिवली
90359 चर्चगेट–मुंबई सेंट्रल
90483 चर्चगेट–बोरिवली
90911 चर्चगेट–मुंबई सेंट्रल
आठवड्याच्या कामकाजाच्या दिवशी AC लोकलची संख्या 145 वरून 147 करण्यात आली आहे.
शनिवार आणि रविवारी 116 AC सेवा धावतील.
याशिवाय दोन नॉन-AC लोकलचे AC लोकलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे:
90693 चर्चगेट–बोरिवली → 94105 AC, चर्चगेटहून सायंकाळी 5:28
90758 बोरिवली–चर्चगेट → 94110 AC, बोरिवलीहून सायंकाळी 6:24
नवीन वेळापत्रकातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे दादर–डहाणू रोड थेट लोकल सेवा.
यापूर्वी 90677 दादर–विरार आणि 93033 विरार–डहाणू रोड या स्वतंत्र सेवा होत्या. आता या दोन्ही सेवा एकत्र करण्यात आल्या आहेत.
नवीन 93033 लोकल दादरहून सायंकाळी 5:22 वाजता सुटून रात्री 7:30 वाजता डहाणू रोडला पोहोचेल.
म्हणजेच प्रवाशांना विरारला उतरून दुसरी लोकल पकडण्याची गरज राहणार नाही.
सकाळची 92046 विरार–दादर लोकल, जी विरारहून सकाळी 8:23 वाजता सुटते, आता चर्चगेटपर्यंत धावणार आहे.
नवीन क्रमांक 92056 असून ती सकाळी 9:48 वाजता चर्चगेटला पोहोचेल.
तर 92069 दादर–विरार या सेवेचा मार्गही बदलण्यात आला आहे. आता 92083 ही लोकल चर्चगेटहून सकाळी 9:52 वाजता सुटून नालासोपारापर्यंत धावेल.
प्रवाशांनी या बदलाची विशेष नोंद घ्यावी.
94113 AC: चर्चगेट 6:22 pm → विरार 7:46 pm
90791: चर्चगेट 7:05 pm → विरार 8:27 pm
या दोन्ही लोकल आता बोरिवली स्थानकावर थांबणार नाहीत.
त्यामुळे या वेळेत बोरिवलीला जाणाऱ्या प्रवाशांना पर्यायी लोकलचा वापर करावा लागेल.
94029 चर्चगेट–बोरिवली AC स्लो आता बोरिवलीऐवजी गोरेगावपर्यंतच धावेल.
नवीन क्रमांक 94045 चर्चगेट–गोरेगाव AC स्लो असा असेल.
तसेच परतीच्या दिशेची 94040 बोरिवली–चर्चगेट सेवा आता गोरेगावहून सकाळी 11:39 वाजता सुटेल आणि तिचा नवीन क्रमांक 94060 गोरेगाव–चर्चगेट AC स्लो असेल.
1 सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेवर काय बदललं?
एकूण लोकल सेवा — 1,414 कायम
नवीन सेवा — 6
बंद सेवा — 6
आठवड्याच्या दिवशी AC लोकल — 145 वरून 147
शनिवार-रविवार AC सेवा — 116
दादर–डहाणू रोड थेट कनेक्टिव्हिटी
विरार–चर्चगेट थेट सेवा
काही फास्ट लोकल बोरिवलीला थांबणार नाहीत
काही AC स्लो लोकल गोरेगावपर्यंत मर्यादित
पश्चिम रेल्वेने वेळापत्रकाचे हे बदल प्रवाशांची मागणी आणि उपलब्ध मार्गक्षमता लक्षात घेऊन केले आहेत. त्यामुळे रोजच्या प्रवासात बदल होणाऱ्या प्रवाशांनी आपल्या नेहमीच्या लोकलची वेळ आणि थांबे एकदा नक्की तपासावेत.
हेही वाचा