मुंबईकरांच्या मदतीसाठी महापौर रस्त्यावर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत दिवसभर २५० मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी तुंबले गेले आहे. ही एकप्रकारची नैसर्गिक आपत्तीच आहे. "अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर आम्ही जनतेला आवाहन केले आहे. तुम्ही शक्यतो घराबाहेर पडू नकात. तसेच जिथे असाल त्या कार्यालयात राहावे, अशी सूचना केली होती. त्याप्रमाणे आम्ही महापालिका कर्मचाऱ्यांची व्यवस्था कार्यालयात केली आहे. अडकलेल्या लोकांसाठी शाळांमध्ये व्यवस्था केलेली आहे. अनेक भागांमध्ये पाणी तुंबल्यामुळे विजेच्या प्रवाहामुळे कोणतीही दुघर्टना घडू नये यासाठी विद्युत पुरवठा खंडित केलेला आहे. मी स्वत: सकाळपासून रस्त्यांवर उतरून लक्ष ठेवून आहे. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी जनतेच्या मदतीची गरज असून त्यांनी शक्यतो सुरक्षित ठिकाणी राहून सहकार्य करावे," असे आवाहन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले आहे. 


हेही वाचा

मुंबईकरांसाठी 'बेस्ट'च्या जादा बसेस


पुढील बातमी
इतर बातम्या