महापौरांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करा, काँग्रेसची मागणी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महिलेचा हात पिरगळण्याच्या घटनेप्रकरणी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर वादाच्या भोवऱ्यात अडकत चालले आहेत. या प्रकरणी महापौर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी मुंबई महिला काँग्रेसनं बुधवारी केली आहे. तसंच, योग्य ती कायदेशीर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देणारे लेखी पत्र त्यांनी निर्मलनगर पोलिसांना दिले आहे.

पावसाची दमदार बॅटींग

मुंबईत मागील आठवड्यात पावसानं दमदार बॅटींग केली होती. त्यामुळं सखल भागांत प्रचंड पाणी साचलं होतं. या साचलेल्या पाण्यामुळं सांताक्रूझ येथील पटेल नगरमध्ये राहणाऱ्या आई आणि मुलाचा शॉक लागून मृत्यू झाला. माला नागम (५६) आणि संकेत नागम (२६) अशी मृत आई आणि मुलाचे नाव असून, याप्रकरणी येथील रहिवाशांनी या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केलं होतं. तसंच, आंदोलनादरम्यान महापौर यांनी घटनास्थळाची चौकशी देखील न केल्याचा आरोप त्यांनी केला.

महापौरांचा मतदारसंघ

सांताक्रझमधील पटेल नगर परिसर हा महापौर यांच्या मतदार संघात येतो. त्यामुळं त्यांनी रविवारी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता, संतप्त रहिवाशांना त्यांना परत जाण्याची विनंती केली. तसंच, बहिणं त्यांचा मृत्यूचा जाब विचारला. त्यावेळी महापौरांनी महिलेचा हात पिळत आणि 'मी कोण आहे माहित आहे का?’ अशा शब्दांत दमबाजी केली.

पाणी भरून शॉर्टसर्किट

या प्रकरणी महापौरांनी त्यांच्याच विभागात योग्य त्या उपाययोजना न केल्यानं पाणी भरून शॉर्टसर्किट होऊन दोघांना जीव गमवावा लागला. त्याबाबत ज्या महिलेनं त्यांना जाब विचारला तिचा हात पिळला. त्यानंतर, प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना 'मी कुठे काय केलेय ते मला दाखवा’, असं वक्तव्य केलं. त्यांच्या या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यांच्यावर सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.


हेही वाचा -

वांद्र्यात तिरुपती देवस्थानास १ रुपया नाममात्र दरानं भूखंड

तब्बल २५ वर्षांनंतर होणाऱ्या विद्यापीठ निवडणुका पुन्हा लांबणीवर


पुढील बातमी
इतर बातम्या