Advertisement

वांद्र्यात तिरुपती देवस्थानास १ रुपया नाममात्र दरानं भूखंड

देशातील प्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थानास मुंबईतील वांद्रे इथं ६४८ चौरस मीटर शासकीय जमीन देण्यात येणार आहे.

वांद्र्यात तिरुपती देवस्थानास १ रुपया नाममात्र दरानं भूखंड
SHARES

देशातील प्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थानास मुंबईतील वांद्रे इथं ६४८ चौरस मीटर शासकीय जमीन देण्यात येणार आहे. ही जमीन वार्षिक १ रुपया एवढ्या नाममात्र दरानं भाडेपट्ट्यानं देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. बाजारमूल्यानुसार वांद्रे येथील भूखंडाची किंमत ही १० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मात्र, देवस्थाननं केलेल्या मागणीनुसार सवलतीच्या दरात हा भूखंड देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे.

मुंबईकरांसाठी सुविधा

तिरुमला तिरुपती देवस्थान ही संस्था आंध्रप्रदेश चॅरिटेबल अॅण्ड हिंदू रिलिजिअस इन्स्टिट्यूट अॅण्ड इंडोव्हमेंट्स अॅक्ट १९८७ अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे. तिरुमला तिरुपती देवस्थान या भूखंडावर छोटे मंदिर, तिरुपती मंदिरातील दर्शनाकरिता आगाऊ नोंदणी किंवा निवासाचं आरक्षण करण्याची व्यवस्था मुंबईतील भाविकांसाठी उपलब्ध करून देणार आहे.

भाडेपट्टीवर भूखंड

वांद्र्यातील ही शासकीय जमीन तिरुमला तिरुपती देवस्थान या संस्थेस ३० वर्षे इतक्या कालावधीकरिता १ रुपया नाममात्र दरानं वार्षिक भुईभाडे आकारुन भाडेपट्ट्यानं देण्यात आली आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशात सत्ताबदल झाल्यावर तिरुमला तिरुपती देवस्थानच्या विश्वस्त मंडळावरील सदस्य बदलण्यात आले.



हेही वाचा -

तब्बल २५ वर्षांनंतर होणाऱ्या विद्यापीठ निवडणुका पुन्हा लांबणीवर

राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा