व्हाट्सअॅप तिकीटिंगद्वारे एका वेळी मेट्रोची 6 तिकिटे बुक होणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई मेट्रो (mumbai metro) अ‍ॅक्वा लाईन 3 (Aqua Line) ज्याला कुलाबा-वांद्रे-सीप्झ कॉरिडॉर म्हणूनही ओळखले जाते. या मेट्रोचे संपूर्ण मार्गिकेचे उद्धाटन केल्यानंतर दररोजच्या प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

मुंबई (mumbai) मेट्रो रेल कॉर्पोरेशन (mmrc) नुसार, 13 ऑक्टोबर रोजी मेट्रो लाईनने नव्याने सुरू झालेल्या मार्गावर एकूण 1,64,877 प्रवाशांची नोंद झाली आहे.

एमएमआरसीने मेट्रो लाईन 3 (Mumbai Metro 3) च्या प्रवाशांसाठी (passenger) व्हॉट्सअॅप-आधारित तिकीट सुरू केले आहे.

ही सेवा प्रवाशांना एका वेळेस सहा पर्यंत क्यूआर तिकिटे तयार करण्याची परवानगी देते. यूपीआय-आधारित पेमेंटसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. तसेच कार्ड व्यवहारांसाठी किमान शुल्क लागू होईल.

बुकिंग कसे करायचे :

  • मुंबई मेट्रो लाईन 3 वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फक्त 91-98730-16836 वर "Hii" पाठवावे लागेल.
  • QR-आधारित WhatsApp तिकिटे जनरेट करण्यासाठी स्थानकांवर असलेला QR कोड स्कॅन करू शकतात.

महा मुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) ने याआधी मुंबई मेट्रो लाईन्स 2A आणि 7 वर अशीच तिकीट सेवा लागू केली आहे.


हेही वाचा

ठाणे: 15 ऑक्टोबरला 'या' भागात पाणीपुरवठा बंद

खड्ड्यांमुळे मृत अथवा जखमींना नुकसान भरपाई

पुढील बातमी
इतर बातम्या