मेट्रो 3 च्या भुयारीकरणाच्या कामावेळी एका कामगाराचा मृत्यू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत सर्वत्र मेट्रोच्या भुयारीकरणाचं काम सुरू असून, कुलाबा- वांद्रे-सीप्झ या मेट्रो 3 मार्गिकेच्या भुयारीकरणाचं काम सध्या सुरू आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत हे काम करण्यात येत आहे. तसंच, ७ टप्प्यात हे काम सुरू आहे. मात्र, शुक्रवारी या भुयारीकरणाच्या कामादरम्यान एका कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

बोगद्याचा भाग कोसळला

मेट्रो ३ च्या भुयारीकरणाच्या कामादरम्यान अचानक बोगद्याचा काही भाग कोसळला. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला. टनल बोअरिंगच्या दरम्यान ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. या कामगाराचं नाव अद्याप समजलं नाही. तसंच, एक कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

रूग्णालयात दाखल

या घटनेनंतर तातडीनं कामगारांना घटनास्थळाहून बाहेर काढण्यात आलं असून, त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली.


हेही वाचा -

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत उदयनराजे यांचा भाजपात प्रवेश

चकमकफेम प्रदीप शर्मा यांचा शिवसेनेत प्रवेश


पुढील बातमी
इतर बातम्या