चकमकफेम प्रदीप शर्मा यांचा शिवसेनेत प्रवेश


चकमकफेम प्रदीप शर्मा यांचा शिवसेनेत प्रवेश
SHARES

पोलीस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले चकमकफेम प्रदीप शर्मा यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पोलीस खात्यातील कारकीर्द गाजवल्यानंतर आता प्रदीप शर्मा राजकीय कारकिर्दीत कोणाचा एनकाउंटर करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. प्रदीप शर्मा यांना नालासोपारा मतदारसंघातून त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. नालासोपार्‍यात उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय आहे. हा मुद्दा लक्षात घेत प्रदीप शर्मा यांना शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. 

शिवसेनेत प्रवेश

शुक्रवारी दुपारच्या सुमारास प्रदीप शर्मा हे ठाणे शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथक कार्यालयात आले होते. या कार्यालयात त्यांच्यासोबत काम केलेल्या सहकाऱ्यांची भेट घेत शर्मा मातोश्रीकडं रवाना झाले. त्यावेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलं. 

नालासोपाऱ्यातून उमेदवारी?

दरम्यान, प्रदीप शर्मा यांनी नालासोपाऱ्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत 'अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, छोटा राजन बबलू श्रीवास्तव किंवा लष्कर-ए-तोयबाचे अतिरेकी यासारखे गॅंगस्टर आणि दहशतवाद्यांशी २ हात केल्यानं माझ्यासाठी वसईची ठाकूर मंडळी त्यापेक्षा मोठी नाही. त्यामुळं नालासोपाऱ्यातून उमेदवारी दिल्यास ती मोहीमही नक्कीच फत्ते करेन', असा विश्वास प्रदीप शर्मा यांनी व्यक्त केला.हेही वाचा -

Share Market भाग ७ : बैल आणि अस्वलाचा असा आहे शेअर बाजाराशी संबंधसंबंधित विषय