Coronavirus cases in Maharashtra: 510Mumbai: 278Pune: 57Islampur Sangli: 25Ahmednagar: 20Nagpur: 16Navi Mumbai: 16Pimpri Chinchwad: 15Thane: 14Kalyan-Dombivali: 10Vasai-Virar: 6Buldhana: 6Yavatmal: 4Satara: 3Aurangabad: 3Panvel: 2Ratnagiri: 2Kolhapur: 2Palghar: 2Ulhasnagar: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Nashik: 1Washim: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 21Total Discharged: 42BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

Share Market भाग ७ : बैल आणि अस्वलाचा असा आहे शेअर बाजाराशी संबंध


Share Market भाग ७ : बैल आणि अस्वलाचा असा आहे शेअर बाजाराशी संबंध
SHARE

तुम्ही दलाल स्ट्रीटवरील मुंबई शेअर बाजाराच्या इमारतीत प्रवेश करतानाच एका बैलाचा पुतळा पाहिला असेल. हा बैल इथे काय करतोय? बैल आणि शेअर मार्केटचा नेमका संबंध काय? असे प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील. पण हा बैल म्हणजे शेअर बाजाराचं प्रतिकच. आज आपण बघूया शेअर बाजार आणि बैलाचं नातं काय आहे.

शेअर बाजारात जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा बुल मार्केट (bull market) आणि बेअर मार्केट (bear market) असे दोन शब्द नेहमी कानावर पडतात. शेअर बाजारातील सर्वसामान्यांना न समजणारी संज्ञा म्हणजे बुल मार्केट आणि बेअर मार्केट. बैल (बुल) आणि अस्वल (बेअर) या दोन प्राण्यांचे स्वभाव परस्पर भिन्न असतात. हे प्राणी जेव्हा विरोधकांवर आक्रमण करतात तेव्हा ते एकमेकांच्या उलट करतात. बैल खूप आक्रमक आहे. बैल विरोधकास मारण्यासाठी शिंगाचा वापर करतो. शिंगाने उचलून बैल फेकून देतो. शिंगावर घेणे, मुसंडी मारणे ह्या म्हणी यामुळेच रूढ झाल्या आहेत. या उलट अस्वलाचा स्वभाव आहे. अस्वल फारसे आक्रमक नाही. चालताना ते रेंगाळत चालते. त्याची चाल शांत, संथ असते. बैल आणि अस्वलाच्या या स्वभावानुसार शेअर बाजारातील तेजी आणि मंदी दर्शवण्यासाठी बुल मार्केट आणि बेअर मार्केट हे शब्द वापरले जातात.

बुल मार्केट म्हणजे तेजी तर बेअर मार्केट म्हणजे मंदी असं म्हटलं जातं. जेव्हा शेअर बाजार तेजीत असतो तेव्हा मार्केट बुलीश आहे असं म्हटलं जातं. तर शेअर बाजार घसरत असल्यास बेअरिश मार्केट म्हटलं जातं. बुल मार्केटमध्ये बाजार  वाढत असतो. मात्र तो किती वर जाईल आणि त्यानंतर किती खाली येईल हे निश्चीत नसल्याने गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुक करतात. ते अापले शेअर्स विकतात आणि नफा कमावतात. बुल मार्केटच्या स्थितीत जास्तीत जास्त लोक शेअर्स विकत असल्याने बाजारात घसरण सुरू होते. म्हणजे जेव्हा शेअर महाग होतात तेव्हा मागणी कमी होते. मागणी कमी झाली की मग भाव घटण्यास सुरूवात होते. हे चक्र कायमच सुरू असते. त्यामुळे बुलीश मार्केट बेअरिश होण्यास सुरूवात होते.

बुल मार्केटमध्ये गुंतवणूकदार आशावादी असतात. ते गुंतवणूक करण्यात आक्रमक असतात. ही स्थिती तात्पुरती किंवा दीर्घकाळ असू शकते. या उलट बेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदार निराशावादी असतात. ते बाजारातील गुंतवणूक कमी करतात. तसंच नव्याने गुंतवणूक करत नाहीत. ही पण स्थिती तात्पुरती किंवा दीर्घकाळ असू शकते. काही ट्रेडर बेअर मार्केट ही स्थिती संधी म्हणून बघतात. कमी दरात शेअर्स खरेदी करून नफा कमावतात.हेही वाचा  -

Share Market भाग १ : शेअर बाजार : छप्पर फाडके रिटर्न देणारी गुंतवणूक

Share Market भाग २ : शेअर बाजाराविषयी अनाठायी भीती

Share Market भाग ३ : जाणून घेऊया शेअर बाजाराचा इतिहास

Share Market भाग ४ : सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय? जाणून घेऊया निर्देशांकांचं महत्त्व

Share Market भाग ५ : डीमॅट - शेअर बाजारात प्रवेशाचा मार्ग

Share Market भाग ६ : जाणून घेऊया आयपीओ आणि एफपीओबद्दल
संबंधित विषय
संबंधित बातम्या