Coronavirus cases in Maharashtra: 441Mumbai: 235Pune: 48Islampur Sangli: 25Ahmednagar: 17Nagpur: 16Pimpri Chinchwad: 15Thane: 14Kalyan-Dombivali: 9Navi Mumbai: 8Vasai-Virar: 6Buldhana: 6Yavatmal: 4Satara: 3Aurangabad: 3Panvel: 2Kolhapur: 2Ulhasnagar: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 19Total Discharged: 42BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

Share Market भाग ४ : सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय? जाणून घेऊया निर्देशांकांचं महत्त्व

सेन्सेक्स हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आहे. तर निफ्टी हा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असतो. शेअर बाजाराची रोजची परिस्थिती आपल्या सेन्सेक्स, निफ्टीवरून समजत असते. सेन्सेक्स म्हणजे सेन्सिटिविटी इंडेक्स (sensitivity index).

Share Market भाग ४ : सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय? जाणून घेऊया निर्देशांकांचं महत्त्व
SHARE

मागील लेखांमध्ये आपण शेअर बाजारात गुंतवणूक का करावी, कशा प्रकारे शेअर बाजाराचा लाभ मिळू शकतो, शेअर बाजाराचा इतिहास याची माहिती घेतली. या लेखात आपण की सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) काय असतो आणि तो कसा काढला जातो? हे जाणून घेणार आहेत.

आपण रोज सेन्सेक्स आणि निफ्टीसंबंधी बातम्या वाचत असतो. सेन्सेक्स वाढला, सेन्सेक्स पडला असं आपण नेहमी एेकत असतो. सेन्सेक्स म्हणजे शेअर बाजार असा हा शब्द इतका परवलीचा झाला आहे. मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) हे देशातील दोन प्रमुख शेअर बाजार आहेत. सेन्सेक्स हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आहे. तर निफ्टी हा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असतो. शेअर बाजाराची रोजची परिस्थिती आपल्या सेन्सेक्स, निफ्टीवरून समजत असते. सेन्सेक्स म्हणजे सेन्सिटिविटी इंडेक्स (sensitivity index). 


३० कंपन्यांचा समावेश

सेन्सेक्स इतक्या इतक्या अंकांनी आपटला, इतक्या इतक्या अंकाने वाढला असं आपण एेकत, वाचत असतो. पण सेन्सेक्सचा हा वाढीचा आणि घटीचा आकडा कसा काढला जातो हा प्रश्न अनेकांना पडला असेल. मुंबई शेअर बाजारात ५ हजारांपेक्षा अधिक कंपन्यांची नोंदणी झाली आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील नोंदणी झालेल्या कंपन्यांचा आकडा जवळपास १९०० आहे. मात्र, सेन्सेक्सची कामगिरी मोजण्यासाठी या ५ हजारांमधील फक्त ३० कंपन्यांचा आधार घेतला जातो. म्हणजे सेन्सेक्समध्ये ३० कंपन्यांचा समावेश होतो. या ३० कंपन्यांच्या शेअर्सची रोजची कामगिरी पाहूनच सेन्सेक्स काढला होताम्हणजे या कंपन्याच्या शेअर्समधील चढ-उतारावरून सेन्सेक्स वाढला की घटला हे ठरते. सेन्सेक्सला बीएसई ३० किंवा बीएसई सेन्सेक्स असंही म्हणतात.


कंपन्या निवडताना निकष

मुंबई शेअर बाजारातील ५ हजार कंपन्यांपैकी सेन्सेक्समध्ये ३० कंपन्या निवडताना काही निकष लावले गेले आहेत. या ३० कंपन्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या विविध औद्योगिक क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात. म्हणजेच त्या - त्या औद्योगिक क्षेत्रातील या कंपन्या आकाराने आणि भागभांडवलाने मोठ्या आहेत. वित्तीय, वाहन, भांडवली वस्तू उद्योग, बँकिंग, तेल व वायू, माहिती तंत्रज्ञान, उर्जा, धातू व खाण, दूरसंचार या क्षेत्रातील कंपन्यांचा सेन्सेक्समध्ये समावेश आहे. या हेवीवेट कंपन्यांच्या शेअर्समधील रोजची होणारी उलाढाल सेन्सेक्सची कामगिरी ठरवतो. सेन्सेक्समधील कंपन्यांची यादी वेळोवेळी बदलत असते. मुंबई शेअर बाजार अावश्यकतेनुसार ह्या यादीत बदल करतो. मात्र, सेन्सेक्समधील शेअर्सची संख्या कायम तीसच असते. ती वाढत नाही किंवा कमी होत नाही. फक्त यातील कंपन्या बदलतात.


निफ्टी फिफ्टी

निफ्टी हा राष्ट्रीय शेअर बाजारातील नोंदणीकृत ५० प्रमुख शेअर्सचा निर्देशांक अाहे. म्हणजे निफ्टीमध्ये ५० शेअर्सचा समावेश होतो. सेन्सेक्सप्रमाणे निफ्टीतील या कंपन्या  हेवीवेट आहेत. २२ वेगवेगळ्या उद्योगांमधून या ५० कंपन्या निवडल्या जातात. निफ्टी NATIONAL अाणि FIFTY या दोन शब्दांपासून तयार झाला अाहे. त्याला निफ्टी फिफ्टी असंही म्हणतात.


फ्री फ्लोट म्हणजे काय?

सेन्सेक्सची गणना फ्री फ्लोट बाजार भागभांडवलावर आधारीत केली जाते. कोणत्याही कंपनीच्या एकूण भागभांडवलाच्या जेवढे भागभांडवल शेअर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असते त्याला बाजार भागभांडवल (Market Capitalization) असे म्हणतात. म्हणजे प्रवर्तक आणि सरकारचा हिस्सा एकूण भागभांडवलातून वजा करून शिल्लक राहिलेली रक्कम बाजारात विकण्यासाठी उपलब्ध असते. ही रक्कम म्हणजेच फ्री फ्लोट बाजार भागभांडवल.

उद्दा. एखाद्या कंपनीचे भागभांडवल २  लाख कोटी रुपये आहे. या भागभांडवलात प्रवर्तक आणि सरकारचा हिस्सा १ लाख कोटी रुपयांचा असल्यास उरलेले १ लाख कोटी रुपय म्हणजे फ्री फ्लोट बाजार भागभांडवल. या १ लाख कोटी  रूपयांचे शेअर्स सर्वसामान्य गुंतवणूकदारांना खरेदीसाठी उपलब्ध असतात.

सेन्सेक्समधील अशा ३० कंपन्यांच्या फ्री फ्लोट भागभांडवलाची बेरीज केली जाते. या एकूण फ्री फ्लोट भागभांडवलाचे जेवढे शेअर्स शेअर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या शेअर्सच्या किमतीची सरासरी काढून सेन्सेक्स काढला जातो. कंपनीकडून जारी केलेल्या एकूण शेअर्सची संख्या गुणिले शेअर्सचा भाव यावरून किती फ्री फ्लोट बाजार भागभांडवल अाहे याची माहिती मिळते. निफ्टीही अशाच प्रकारे ५० कंपन्यांच्या फ्री फ्लोट बाजार भागभांडवलावर काढला जातो.


आधार मूल्य १००

सेन्सेक्सचे आधार मूल्य१ एप्रिल १९७९ पासून १००  प्रमाणे घेतले आहे. यासाठी १९७८-७९ आधार वर्ष आहे. म्हणजे सेन्सेक्स सुरू झाला तेव्हा तो १०० अंक होता. निफ्टीचे आधार वर्ष १९९५ आहे आणि आधार अंक १००० आहे. निफ्टीची गणना ३ नोव्हेंबर १९९५ पासून केली जाते. म्हणजे निफ्टी सुरू झाला तेव्हा तो १००० अंकापासून पासून सुरू झाला असे म्हणूया. या दोन्ही निर्देशांकाचा एकच हेतू म्हणजे शेअर बाजारातील स्थिती सांगणे.थोडक्यात सेन्सेक्स, निफ्टीचे बदलणारे अंंक अापल्याला शेअर बाजारातील सद्यपरिस्थितीत दाखवतात.

 

अनेक निर्देशांक

मुंबई शेअर्स बाजाराचे (बीएसई) सेन्सेक्स सारखेच आणखी काही निर्देशांक आहेत. उदा. बीएसई ५०, बीएसई १००, बीएसई २००, बीएसई ५००, बीएसई स्माॅल कॅप, बीएसई लार्ज कॅप. तर एनएसईचे निफ्टी फिफ्टी सारखेच एनएसई १००, एनएसई २००, एनएसई ५०० एनएसई मिडकॅप, एनएसई बँक, एनएसई फार्मा आदी निर्देशांक आहेत.

 

सेन्सेक्समधील शेअर्स  

 • हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स काॅर्पोरेशन
 • सिपला
 • भारत हेवी इलेक्ट्रिकल लि.
 • स्टेट बँक आॅफ इंडिया
 • आयसीआयसीआय बँक
 • एचडीएफसी बँक
 • हिरो मोटोकाॅर्प
 • ओएनजीसी
 • इन्फोसिस
 • रिलायन्स इंडस्ट्रीज
 • टीसीएस
 • टाटा पाॅवर
 • हिंदाल्को इंडस्ट्रीज
 • लार्सन अँड ट्युब्रो
 • महिंद्रा अँड महिंद्रा
 • टाटा मोटर्स
 • टाटा स्टील
 • हिंदुस्थान युनिलिव्हर
 • आयटीसी
 • स्टरलाईट इंडस्ट्रीज
 • विप्रो
 • सन फार्मा
 • गेल
 • जिंदाल स्टील
 • भारती एअरटेल
 • मारुती सुझुकी
 • एनटीपीसी
 • डीएलएफ
 • बजाज आॅटो
 • कोल इंडियाहेही वाचा -

शेअर बाजार : छप्पर फाडके रिटर्न देणारी गुंतवणूक

शेअर बाजाराविषयी अनाठायी भीती

जाणून घेऊया शेअर बाजाराचा इतिहास
संबंधित विषय
ताज्या बातम्या