मुंबई महापालिकेचे पाणीबिलाचे 5207 कोटी रुपये थकीत

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्य (maharashtra) सरकारमधील म्हाडा, एमएमआरडीएसह (mmrda) विविध प्राधिकरणे, रेल्वे यासह खासगी आस्थापनांकडून मुंबई महापालिकेला (bmc) गेल्या 20 वर्षांपेक्षा जास्त कालावधीत पाच हजार 207 कोटी रुपयांची पाणीबिलाची थकीत रक्कम अद्याप मिळालेली नाही.

एकट्या म्हाडाकडून (mhada) 584 कोटी रुपये थकीत पाणीबिल (water bill) भरण्यात आलेले नाही. खासगी मालमत्ताधारकांकडूनही येणारी थकीत रक्कम मोठी आहे.

पाण्याचे बिल एका महिन्यात अदा करणे बंधनकारक आहे. मात्र दिलेल्या मुदतीत बिल न भरल्यास देयकाच्या रकमेवर दर महिन्याला दोन टक्के आकारणी केली जाते.

या अतिरिक्त आकारातून जलजोडणीधारकांना विशेष सवलत देण्यासाठी 2019-20 पासून अभय योजना 2020 सुरू करण्यात आली होती.

मार्च 2002 पासून पाणीपट्टी थकबाकी वाढतच आहे. आत्तापर्यंत पाच हजार 207 कोटी रुपये पाण्याचे बिल विविध प्राधिकरणे, खासगी आस्थापना, रहिवासी सोसायट्यांनी भरलेले नाही.

यामध्ये म्हाडाकडून 584 कोटी 54 लाख रुपये पाणीबिलाची रक्कम अदा करण्यात आलेली नाही. पाणीबिल अदा न करण्यात रेल्वे प्रशासनही आघाडीवर आहे.

पश्चिम रेल्वेकडून 343 कोटी 41 लाख, मध्य रेल्वेकडून 185 कोटी 55 लाख रुपये पाणीबिल भरलेले नाही.

झोपडपट्टी, रहिवासी इमारती, व्यावसायिक इमारती, चाळी आदींकडून एकूण दोन हजार 489 कोटी 38 लाख रुपयांचे पाणीबिलही वसूल झालेले नाही.

फेब्रुवारी 2026 पर्यंत मुंबई महापालिकेचे एकूण तीन हजार 818 कोटी 55 लाख रुपयांचे पाणीबिल थकीत होते.

यामध्ये म्हाडाची थकबाकीची रक्कम 563 कोटी 9 लाख रुपये होती. पश्चिम रेल्वेकडून 332 कोटी 98 लाख, मध्य रेल्वेकडून 183 कोटी 58 लाख रुपये पाणीबिल भरलेले नव्हते.

पाणीबिल न भरलेली अन्य प्राधिकरणे

बीपीटी : 36 कोटी 43 लाख रुपये

एमएमआरडीएः 21 कोटी 56 लाख रुपये

बेस्ट: 40 कोटी 9 लाख रुपये

केंद्र सरकारचे कार्यालय : 88 कोटी 98 लाख रुपये

मुंबई महापालिका कार्यालयः 46 कोटी 3 लाख रुपये

अन्यः 53 कोटी 60 लाख रुपये


हेही वाचा

1 मे पासून चीज ॲनालॉगला पनीर म्हणून विकता येणार नाही: एफडीए

म्हाडा घरांच्या किमतीत कपात करण्याची शक्यता

पुढील बातमी
इतर बातम्या