कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा खास आराखडा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. १५ मे पर्यंत हा आकडा ७० हजारापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने आता कंबर कसली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पालिका कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देणार आहे. यासाठी पालिकेने खास आराखडा तयार करून स्वतंत्र टीम तयार केली आहे.

राज्य सरकारने केंद्रीय पथकाच्या हवाल्याने मे च्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ७० हजारापर्यंत जाईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेला योग्य त्या उपाययोजनांची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार पालिकेने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि कंटेन्मेंट झोनमधील उपाययोजनांसाठी अधिकाऱ्यांची स्वतंत्र टीम तयार केली आहे. पालिका सध्या तीन पातळ्यांवर काम करते आहे. एक म्हणजे अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचून चाचण्या सुरू आहेत. त्यात पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांना पालिका शाळांमध्ये व्यवस्था केलेल्या ठिकाणी उपचार सुरू केले आहेत.

दुसरी गोष्ट म्हणजे जे रूग्ण पॉझिटिव्ह आहेत पण ज्यांच्यामध्ये सर्दी, ताप, खोकला अशी कोणतीही लक्षणे नाहीत, अशा रूग्णांसाठी मोठमोठ्या शाळा आणि बीकेसीसारख्या ठिकाणी व्यवस्था केली जात आहे आणि ज्या रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, त्यांच्यासाठी रूग्णालयात खाटांची व्यवस्था केली जात आहे.

मुंबईत प्रत्येक सात दिवसांनी रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. १७ एप्रिलला २१२९ असणारी रुग्णसंख्या आठवड्यानंतर २३ एप्रिल रोजी ४२३२ वर पोहचली आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी सात दिवसांऐवजी तो ८, ९ किंवा १० दिवसांवर नेण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.


हेही वाचा -

Coronavirus Update: धारावीत ३४ नवे कोरोनाग्रस्त, एकूण संख्या २७५ वर

Coronavirus Updates: मृत पोलिसांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख, सरकारी नोकरी


पुढील बातमी
इतर बातम्या