मुंबई महापालिकेचा सन 2027– 27 या आर्थिक वर्षासाठीचा 80952.56 कोटी रुपयांचा आणि 89.84 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला.
मुंबई महापालिकेचे (brihanmumbai municipal corporation) आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थायी समितीच्या बैठकीत समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना अर्थसंकल्प सादर केला.
मुंबई महापालिकेचा सन 2025-26 या वर्षासाठी महापालिकेचा एकूण अर्थसंकल्प (budget) 74,424.41 कोटी रुपये इतका होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प 8.77 कोटी रुपयांनी जास्त आहे.
या अर्थसंकल्पात विकासकामांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच, प्रशासकीय खर्चात बचत करण्याचे धोरण अवलंबले आहे.
अर्थ संकल्पातून एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे मुंबई (mumbai) महापालिका आणखी काही ठेवी मोडण्याच्या तयारीमध्ये आहे.
मुंबई महापालिकेकडे सध्या स्थितीमध्ये एकूण 81 हजार 449 कोटी 32 लाख रुपयांच्या ठेवी (deposit) शिल्लक आहेत. त्यापैकी 44 हजार 826 कोटी 23 लाख रुपयांच्या ठेवी या राखीव असल्यामुळे महापालिका या ठेवी मोडू शकत नाही.
परंतु उर्वरित 36 हजार 623 कोटी 09 लाख रुपये पालिका वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वापरणार असल्याचं अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
नव्या नियमांनुसार 40 बाय 40 फुटांपेक्षा मोठे जाहिरात फलक लावण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे, तसेच पदपथांवर आणि इमारतींच्या गच्चींवर जाहिरात फलक लावण्यासही मनाई करण्यात आली आहे.
अशा प्रकारच्या जाहिरातींसाठी यापुढे कोणतीही नवी परवानगी दिली जाणार नाहीये. या निर्णयामुळे अनधिकृत आणि धोकादायक जाहिरात फलकांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाच्या माध्यमातून आतापर्यत 1.35 कोटी नागरिकांनी लाभ घेतला आहे.
यामध्ये बदल करून आता आपला दवाखानाच्या माध्यमातून मधुमेह आणि नेत्ररोगाकरिता AI द्वारे मोफत उपचार केले जाणार आहेत. 2026-27 च्या अर्थसंकल्पात आरोग्य खात्यासाठी 5237 कोटी प्रस्तावित आहेत.
मुंबईतील (mumbai) वाढतं प्रदूषण पाहता पालिकेकडून पर्यावरण आणि स्वच्छतेसाठी भरीव तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे, यासाठी एकूण 159.82 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
हेही वाचा