बुलाती है मगर जाने का नहीं, मुंबई पोलिसांचं मजेशीर मीम्स व्हायरल

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वेगाने पसरत असलेला कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे अनेक देशांनी संपूर्ण शहरेच लॉक डाऊन केली आहेत. राज्य सरकारनेही गर्दी होऊ नये म्हणून अनेक उपाययोजना केल्या आहेत. सार्वजनिक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच काही ठिकाणी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोरोना पसरू नये म्हणून लोकांनी गर्दीची ठिकाणी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी एक मजेशीर मीम्स ट्विट केलं आहे. जनजागृती मुंबई पोलिसांनी एक भन्नाट मीम्स शेअर केले आहे. या मीम्समध्ये मुंबई पोलिसांनी प्रसिद्ध शायर आणि गीतकार राहत इंदौरी मास्क घालून उभे असलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या बाजूला ‘जो व्हायरस है वो फैलाने का नाही, बुलाती है मगर जाने का नही’ असं लिहिलं आहे. मुंबई पोलिसांचे हे मजेशीर ट्विट सध्या सोशल मीडियावर  व्हायरल झाले आहे. राहत इंदौरी यांनीही पोलिसांचे हे ट्विट रिट्विट केले आहे.

मुंबई पोलिसांचे हे जनजागृती करणारे ट्विट सोशल मीडियावर अनेक जण शेअर करत आहेत. तसेच अनेक सेलिब्रिटी देखील सॅनेटायझर किंवा साबणाने स्वच्छ हात धूण्यासाठी लोकांना आवाहन करत आहेत. 


हेही वाचा -

Coronavirus Updates: पश्चिम रेल्वेची एसी लोकल बंद

Coronavirus : क्वारंटाईनचा सल्ला दुर्लक्षित करून चौघा तरूणांचा ट्रेनमधून प्रवास


पुढील बातमी
इतर बातम्या