Mumbai Rains Update : तलावांमधील पाण्याची पातळी एका दिवसात 8% टक्क्यांनी वाढली

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

एका दिवसात मुंबईतील सातही (Mumbai lake) तलावांतील एकत्रित पाणीसाठ्यात ७ ते ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) उघड केलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवार 28 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत हा साठा 68.06 टक्के आहे.

बुधवारपासून मुंबई (Mumbai) आणि उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळेच पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे बोलले जात आहे. गुरुवारी देखील मुसळधार पाऊस मुंबईत सुरू होता. गुरुवारी पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबईतल्या 7 तलावांमध्ये 61.58 टक्के पाणीसाठी उपलब्ध आहे. जो की पुढचे 7 महिने पुरू शकतो. 

शुक्रवारी देखील पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे एका दिवसाच्या पावसामुळे तलावांमधील पाणी पातळीत वाढ झाली आहे. सध्या ६८ टक्के इतका पाणीसाठी तलावांमध्ये असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. 

शिवाय, गुरुवारी रात्री उशिरा, नागरी संस्थेने ठाण्यातील मोडक सागर - पावसाळ्याच्या एका महिन्यापेक्षा जास्त कालावधीत ओसंडून वाहत असलेला आणखी एक जलसाठा दाखवणारा व्हिडिओ शेअर केला. यासह, हे आतापर्यंत ओव्हरफ्लो झालेले चौथे तलाव ठरले आहे. यापूर्वी तुलसी, तानसा, विहार हे देखील ओव्हरफ्लो झाले आहेत. 


हेही वाचा

मुंबईला पाणीपुरवठा करणारा चौथा तलाव मोडकसागरही ओव्हरफ्लो

मुंबईकरांना प्रीपेड वीजमीटरचा 'शॉक'? अदानीकडे कंत्राट, बेस्टला भुर्दंड, काँग्रेसचा आरोप

पुढील बातमी
इतर बातम्या