Advertisement

मुंबईला पाणीपुरवठा करणारा चौथा तलाव मोडकसागरही ओव्हरफ्लो

मुसळधार पावसामुळे यापूर्वी ३ तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणारा चौथा तलाव मोडकसागरही ओव्हरफ्लो
File photo
SHARES

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी आणखी एक तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. मुंबईतील मोडक सागर गुरुवारी 27 जुलैला रात्री १०.५२ वाजता ओव्हरफ्लो झाला. 

जुलै महिन्यात सगळीकडेच चांगला पाऊस झाला. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे ४ तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. तुलसी, तानसा, विहार आणि मोडक सागर असे ४ तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. 

मुंबईच्या जलाशयांमध्ये 61 टक्क्यांहून अधिक पिण्याचे पाणी साठले आहे. या जलाशयांमध्ये एवढा पाणीसाठा आहे की, मुंबईत ७ महिने पाणी पुरवठा होईल.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या एकूण 7 जलाशयांमध्ये 14 लाख एमएलडी पाणीसाठा झाला, तर मुंबईला वर्षभर पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. या जलाशयांमध्ये आतापर्यंत आठ लाख एमएलडी पाणी जमा झाले आहे. या जलाशयांमधून मुंबईला दररोज सुमारे 4000 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो.

या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला 

हवामान खात्याने साताऱ्यात रेड अलर्ट जारी केला असून गडचिरोलीतही त्याचा जोर आहे. सध्या कोल्हापुरात पावसाने नागरिकांना दिलासा दिला आहे.

दुसरीकडे, पुणे शहरात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. सातारा, रत्नागिरी, गडचिरोली, चंद्रपूर, विदर्भात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच कोकण, कोल्हापूर, नागपूर, गोंदिया, भंडारा, यवतमान जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.



हेही वाचा

पुढचे 5 दिवस पावसाचेच, NDRF च्या 13 टीम तैनात

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा