मुंबईत दुचाकींसाठी नवीन MH01FL नंबर सिरीज 10 ऑगस्टपासून लाँच

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई (सेंट्रल) प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) खासगी दुचाकी वाहनांसाठी 10 ऑगस्टपासून नवीन MH01FL नोंदणी सिरीज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सुरू असलेली MH01FK सिरीज संपत आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आपल्या पसंतीचा किंवा फॅन्सी नोंदणी क्रमांक (Fancy Number) घ्यायचा असल्यास वाहनधारकांनी 10 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आरटीओने स्पष्ट केले आहे.

फॅन्सी नंबरसाठी अर्ज कसा कराल?

आरटीओच्या माहितीनुसार, अर्जदारांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक शुल्कासह काउंटर E-11 येथे जमा करावा. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 अंतर्गत निर्धारित शुल्क भरून पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

जर एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आले, तर 10 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता लिलाव (Auction) घेऊन संबंधित नोंदणी क्रमांक वाटप केला जाईल.

अर्जासोबत कोणती कागदपत्रे आवश्यक?

फॅन्सी नंबरसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे:

  • फोटो ओळखपत्र

  • पत्त्याचा पुरावा

  • पॅन कार्ड

  • वाहन खरेदीची पावती

आरक्षित नंबर किती दिवस वैध?

आरक्षित केलेला नोंदणी क्रमांक 180 दिवसांसाठी वैध राहील. या कालावधीत संबंधित वाहनाची नोंदणी करणे आवश्यक आहे.

वाहन नोंदणी प्रक्रियेदरम्यान VAHAN-04 प्रणालीमध्ये आरक्षणाची नोंद झाल्यानंतर संबंधित नंबर सक्रिय केला जाईल.

आरटीओ (मुंबई सेंट्रल)ने सांगितले की, अर्जाचे नमुने काउंटर E-11 येथे उपलब्ध असून, अर्जदारांना मदत करण्यासाठी तेथे स्वतंत्र कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहेत.


हेही वाचा

जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी बीएमसीची नवी सुविधा

पुढील बातमी
इतर बातम्या