राणीच्या बागेत लवकरच भूमिगत मत्स्यालय सुरू होणार

Representational Image
Representational Image
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राणीची बाग परिसरातील मफतलाल मिलच्या जागेत नऊ एकर जागेवर अत्याधुनिक भूमिगत मत्स्यालय आणि समुद्र किनारी रस्त्यालगत काही भागात मत्स्यालय उभारण्याचा प्रस्ताव आहे.

वरळीतील आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील मत्स्यालय दोन-तीन मजली होती. त्या जागेची किंमत 1800 कोटी रुपये होती. जगभरातील अत्याधुनिक मत्स्यालय भूमिगत असल्याने आणि वरळीतील मत्स्यालय अव्यवहार्य असल्याने महसूल व अन्य विभागांनी ती जागा काढून घेतली आणि हा प्रस्ताव रद्द करण्यात आला.

मुंबईतील राणीची बाग परिसरात, भूगर्भात आणि किनारी भागात आता काही अनोख्या माशांसाठी संलग्न मत्स्यालय उभारले जाणार आहे. प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या मत्स्यालयामुळे मुंबईची जागतिक पर्यटन नकाशावर ओळख होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

मराठी माणसांनी मुंबई सोडून जाऊ नये यासाठी अनेक प्रकल्प व योजना हाती घेतल्या जात आहेत. या संदर्भात शहर व जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत 360 कोटी रुपयांच्या निधीच्या तरतूदीसह अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा नाईट लाईफसाठी वेगळा प्रस्ताव होता. काही विभागांमध्ये रहदारीची समस्या नसल्यास आणि इतर बाबी तपासून पाहिल्यानंतर रस्त्यांवर, पदपथांवर किंवा खाद्य मेळ्यांच्या शेजारी स्टॉल्स किंवा लहान 'फूड मॉल'ना परवानगी देण्याचा विचार आहे. या संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) विभाग निश्चित करून प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

मुंबईकरांना आणि पर्यटकांना मालवणी, कोळी आदी विविध खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेता येईल. वरळी, माहीम आणि कुलाबा कोळीवाड्यातील काही ठिकाणी मासे सुकवणारी ठिकाणे विकसित करण्यासाठी निधी देण्यात आल्याची माहिती केसरकर यांनी दिली. याद्वारे खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेता येईल.


हेही वाचा

मुसळधार पावसामुळे स्कूल बस सेवेवर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई विमानतळाचे सिक्युरिटी चेक पॉईंट्स वाढले, प्रवाशांचा वेळ वाचणार

पुढील बातमी
इतर बातम्या