वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून १३९ कोटी रुपये दंड वसूल

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत अनेकदा वाहन चालक वाहतुकीचे नियम मोडत प्रवास वाहन चालवताना पाहयला मिळतात. त्यामुळं या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ई-चलन योजना आमलात आणली. या योजनेअंतर्गत वाहतुक पोलिसांनी २०१८ या वर्षात सर्वाधिक दंड म्हणजे १३९ कोटी रुपये वसूल केल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत, आरटीआय कार्यकर्ता जितेंद्र घडगे यांनी माहिती दिली आहे. २०१७ या वर्षात नियमांच उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून ८.६ कोटी रुपये वसूल करण्यात आले होते. मात्र, २०१७ या वर्षाच्या तुलनेत ही रक्कम जास्त असून, इ-चलन या योजनेमुळं संख्येत वाढ झाल्याची माहिती अधिकाऱ्यानं दिली.  

वाहतूक नियमांच उल्लंघन

आरटीआय कार्यकर्ता जितेंद्र यांच्या म्हणण्यानुसार, वाहतूक विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या ई-चलन या योजनेमुळं वाहतूक नियमांच उल्लंघन करणाऱ्या चालकांना त्यांच्या मोबाईलवर संबंधित दंडाची माहिती आली आहे. ई-चलन आणि रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेरांच्या मदतीनं वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांच उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कडक कारवाई केली असून, त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे. विषेश म्हणजे मागील ३ वर्षात मध्यपान करून गाडी चालवणाऱ्यांची संख्या कमी असून इतर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांची संख्या जास्त आहे. 

आयरटीआयची आकडेवारी

आयरटीआयच्या आकडेवारीनुसार, २०१६ मध्ये मध्यपान करून गाडी चालवणाऱ्यांची संख्या २०,७६८ इतकी होती. मात्र २०१७ आणि २०१८मध्ये अनुक्रमे १८,०५६ आणि ११,७११ इतकी होती. २०१५ ते जुलै २०१९पर्यंत मुंबईत ड्रिंक अॅण्ड ड्राइव्हचे एकूण ७७,४५५ गुन्हे समोर आले आहेत.  


हेही वाचा -

गणेशोत्सव २०१९: जीएसबी मंडळानं भक्तांच्या सुरक्षेसाठी काढला २६६.६५ कोटींचा विमा

गणेशोत्सव २०१९: अंधेरीच्या राजाला सजवायला आला अमेरिकन डिझायनर...


पुढील बातमी
इतर बातम्या