Advertisement

गणेशोत्सव २०१९: जीएसबी मंडळानं भक्तांच्या सुरक्षेसाठी काढला २६६.६५ कोटींचा विमा

बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी रांग लावावी लागत असल्यानं यावेळी कोणतीही दुर्घटन घडल्यास प्रवाशांच्या सेवेसाठी मंडळानं यंदा २६६.६५ कोटी रुपयांचा विमा काढला आहे.

गणेशोत्सव २०१९: जीएसबी मंडळानं भक्तांच्या सुरक्षेसाठी काढला २६६.६५ कोटींचा विमा
SHARES

मुंबईतील लालबागचा राजा, गणेश गल्ली, चिंचपोकळीचा चिंतामणी यांसारख्या अनेक प्रसिद्ध मंडळातील बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गणेशभक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या मंडळांशिवाय मुंबईतल्या किंग सर्कल येथील गौर सारस्वत ब्राह्मण सेवा मंडळ (जीएसबी) हा गणपती लोकप्रिय असून, या बाप्पाच्या दर्शनासाठी देशभरातून गणेशभक्त येत असतात. तसंत, बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी रांग लावावी लागत असल्यानं यावेळी कोणतीही दुर्घटन घडल्यास प्रवाशांच्या सेवेसाठी मंडळानं यंदा २६६.६५ कोटी रुपयांचा विमा काढला आहे.    

दर्शनासाठी मोठी रांग

दरवर्षी जीएसबीच्या गणपती बाप्पाचं दर्शनासाठी मंडळात मोठी गर्दी असते. त्यामुळं या भक्तांच्या सुरक्षेसाठी हा विमा काढण्यात आल्याचं मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या विम्यानुसार मंडळात एखादी दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेत भक्ताचा मृत्यू झाल्यास त्याला २० कोटी रुपयांची भरपाई मिळेल. जीएसबी मंडळानं याआधीही २०१७ आणि २०१८ यावर्षी विमा काढला होतो. २०१७ आणि २०१८ अनुक्रमे २६४.२५ कोटी रुपये आणि २६५ कोटी रुपयांचा विमा काढला होता.

इकोफ्रेंडली सजावट

जीएसबी मंडळानं यंदा पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी इकोफ्रेंडली सजावट करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळात प्लास्टिकचा वापर कमी करावा याबाबत संदेश देण्यासाठी बॉटल क्रशर मशीन लावण्यात येणार आहे.



हेही वाचा -

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल शिवसेनेत

गणेशोत्सव २०१९: अंधेरीच्या राजाला सजवायला आला अमेरिकन डिझायनर...



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा