मुंबईत अवजड वाहनांवर नवे निर्बंध

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई वाहतूक पोलिसांनी (MTP) शहरातील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर नवीन निर्बंध जाहीर केले आहेत. हे नवे नियम 1 फेब्रुवारीपासून लागू होतील.

नव्या आदेशानुसार, सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत अवजड वाहनांना मुंबईत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

दक्षिण मुंबईत हे नियम आणखी कडक असणार आहेत. लक्झरी बसेससह सर्व अवजड वाहनांवर सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत केवळ अत्यावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांनाच प्रवेश दिला जाईल.

अवजड वाहनांना दक्षिण मुंबईत फक्त रात्री 12 ते सकाळी 7 या वेळेतच प्रवेशाची परवानगी असेल.

तसेच वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांच्या पार्किंग नियमांमध्येही कडकपणा आणला आहे. आता अशा वाहनांना केवळ खासगी किंवा भाड्याने घेतलेल्या पार्किंग जागांमध्ये, अथवा अधिकृत ‘पे अँड पार्क’ झोनमध्येच पार्किंग करता येईल.

सार्वजनिक रस्त्यांवर पार्किंग करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. पाणीपुरवठा केंद्रांच्या जवळील रस्त्यांवर केवळ दोन पाण्याच्या टँकरांना पार्किंगची परवानगी दिली जाईल.


पश्चिम रेल्वेवर 'या' तारखेपासून 4 अतिरिक्त नॉन-एसी लोकल धावणार

पुढील बातमी
इतर बातम्या