Poll Result - मुंबई लोकल सुरू; नागरिकांनी मानले राज्य सरकारचे आभार

महाराष्ट्र सरकारने राज्यभरातील कोरोनाच्या  निर्बंधांमध्ये अनेक शिथिलता जाहीर केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं नवीन गाईडलाईन्स जारी केली असून, १५  ऑगस्टपासून हे नवीन नियमावली लागू झाली आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेन सेवा पूर्णपणे लसीकरण झालेल्या नागरीकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आली.

याबाबत मुंबई लाईव्हने आपल्या ट्विटर एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात मुंबईकर मुंबई लोकल ट्रेन सेवा पुन्हा सुरू करण्याचे श्रेय ते कोणाला देतील?

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेण्याचे आणि पूर्णपणे लसीकरण केलेल्या प्रवाशांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यास परवानगी देण्याचे कारण बहुतांश नागरिकांनी दिले यात आश्चर्य नाही.

दरम्यान, असे काही नागरिक आहेत जे सामान्य प्रवाशांसाठी लोकल ट्रेन सेवा पुन्हा सुरू करण्याची राज्य सरकारची वाट पाहत आहेत.

लोकल प्रवासासाठी युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास महत्वाचा असून हा पास आपण https://epassmsdma.mahait.org ला भेट देऊन ऑनलाइन घेऊ शकता.

पुढील बातमी
इतर बातम्या