हार्डवर्कर मुंबईकर!

  • मुंबई लाइव्ह टीम & अतुल चव्हाण
  • सिविक

मुंबई कधीच झोपत नाही. येथील रस्त्यांवर नेहमीच वर्दळ पाहायला मिळते. हे आजवर आपण ऐकलं आहे. पण आता मुंबईकर जगात सर्वात जास्त तास काम करणारे आणि हार्डवर्कर म्हणजेच कष्टाळू असल्याचं सिद्ध झालं आहे. हे आम्ही नाही तर स्विस बॅंक युबीएस या संस्थेने केलेल्या जागतिक सर्वेक्षणात स्पष्ट झालं आहे.

जगभरातल्या ७७ शहरांचा सर्वे

स्विस बॅंक युबीएस या संस्थेने जगभरातील ७७ प्रमुख शहरांमध्ये एक सर्वे केला. यामध्ये त्या शहरांतील लोकांचं जीवनमान, त्यांच्या कामाचे सरासरी तास, त्यांचं वार्षिक सरासरी उत्पन्न याबाबतीतील निरीक्षण नोंदवण्यात आलं. या सर्वेनुसार मुंबईतील लोक एका वर्षात ३३१४.७ तास काम करतात. त्यांची एकूण सरासरी १९८७ तास एवढी आहे. तर रोममधील लोकं १५८१ तास आणि पॅरिसमधील लोकं १६६२ तास काम करतात.

मुंबईकर करतात दुप्पट काम

या सर्वेनुसार रोम आणि पॅरिस या शहरांतील लोकांपेक्षा मुंबईकर दुप्पट काम करतात. मात्र या कामाचा मोबदला मुंबईकरांना त्यामानाने कमी मिळतो. न्युयॉर्कमधील लोकांना फक्त ५४ तास काम करून आयफोन घेण्याएवढी मिळकत प्राप्त होते. तेच मुंबईकराला एक आयफोन खरेदी करण्यासाठी ९१७ तास काम करावं लागतं. त्यामुळे कमाईच्या बाबतीत मुंबई ७६ व्या क्रमांकावर आहे.


हेही वाचा - 

स्वच्छ सर्वेक्षण 2018 : मुंबई सर्वात स्वच्छ राजधानी!

पुढील बातमी
इतर बातम्या