Advertisement

सफाई कामगारांचा 'ऑफिसर ऑफ द मंथ' पुरस्काराने गौरव

महापालिकेचे सफाई कामगार, कर्मचारी आणि अधिकारी यांनी दिवस रात्र एक करून केलेल्या प्रयत्नांचा मोठा वाटा आहे. ही बाब लक्षात घेऊन 'जून २०१८' साठी घनकचरा व्यवस्थापन खात्यातील दोन सफाई कामगार, दोन कर्मचारी आणि एक अधिकारी यांचा प्रातिनिधीक स्वरुपात 'ऑफीसर ऑफ द मंथ' या बहुमानाने महापालिका आयुक्तांच्या हस्ते शनिवारी सत्कार करण्यात आला.

सफाई कामगारांचा 'ऑफिसर ऑफ द मंथ' पुरस्काराने गौरव
SHARES

'स्वच्छता सर्वेक्षण २०१८' या सर्वेक्षणांतर्गत मुंबई महापालिकेला देशभरात प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आले आहे. या गौरवात महापालिकेचे सफाई कामगार, कर्मचारी आणि अधिकारी यांनी दिवस रात्र एक करून केलेल्या प्रयत्नांचा मोठा वाटा आहे. ही बाब लक्षात घेऊन 'जून २०१८' साठी घनकचरा व्यवस्थापन खात्यातील दोन सफाई कामगार, दोन कर्मचारी आणि एक अधिकारी यांचा प्रातिनिधीक स्वरुपात 'ऑफीसर ऑफ द मंथ' या बहुमानाने महापालिका आयुक्तांच्या हस्ते शनिवारी सत्कार करण्यात आला.


यांचा सत्कार

घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक तानाजी लक्ष्मण घाग, सहाय्यक अभियंता अजय रामभाऊ पाटणे, सफाई कामगार अरुणा भगवान पुराडकर, सफाई कामगार संतोष लक्ष्मण वनगुले, कनिष्ठ अवेक्षक लीना खोडीदास चारनीया आदींचा समावेश आहे.


तक्रारींच्या निराकरणासाठी विशेष कक्ष

'स्वच्छ भारत अभियान' महापालिका क्षेत्रात प्रभावीपणे राबवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन खात्यातील अनेक कर्मचारी दिवस रात्र मेहनत घेत आहेत. 'गुड मॉर्निंग' पथकाच्या समवेत पहाटे ४.०० वाजेपासून अनेक अधिकारी देखील स्वयंस्फूर्तपणे जनजागृतीचे काम करत आहेत. कुठे पथनाट्यांचं आयोजन केलं जात आहे, तर कुठे वस्तीसभा घेऊन जाणीव-जागृती साधली जात आहे. तसंच स्वच्छताविषयक तक्रारींचं निराकरण करण्यासाठी एक विशेष कक्ष देखील सुरू आहे.


सत्कार प्रसंगी यांची उपस्थिती

या सत्कार प्रसंगी अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन, विजय सिंघल, आबासाहेब जऱ्हाड, उपायुक्त रमेश पवार, विजय बालमवार, सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासह महापालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.


सफाई कामागरांचा प्रथमच सत्कार

मुंबई महापालिकेत वैशिष्ट्यपूर्ण आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तव्यतत्पर कर्मचाऱ्यांना 'ऑफीसर ऑफ द मंथ' या बहुमानाने गौरवण्याची पद्धत डिसेंबर २०१५ पासून महापालिकेत सुरू करण्यात आली आहे. या श्रृंखलेंतर्गत आतापर्यंत फक्त अधिकाऱ्यांचाच 'ऑफीसर ऑफ द मंथ' म्हणून महापालिका आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. मात्र, यावेळी प्रथमच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामागरांचाही प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला आहे.


हेही वाचा - 

स्वच्छ सर्वेक्षण 2018 : मुंबई सर्वात स्वच्छ राजधानी!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा