Advertisement

स्वच्छ सर्वेक्षण 2018 : मुंबई सर्वात स्वच्छ राजधानी!

केंद्र सरकारने स्वच्छता सर्वेक्षण २०१८ अतंर्गत देशातील विविध राज्यांच्या राजधानींचं सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणात मुंबई महापालिकेने प्रथम क्रमांक पटकवला आहे.

स्वच्छ सर्वेक्षण 2018 : मुंबई सर्वात स्वच्छ राजधानी!
SHARES

मुंबईला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी महापालिकेने राबवलेल्या उपक्रमांमुळेच आज केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या यादीत मुंबईला सर्वात स्वच्छ राजधानीचा बहुमान मिळाला आहे. बुधवारी नवी दिल्लीत यासंदर्भात घोषणा करण्यात आली.

केंद्र सरकारने स्वच्छता सर्वेक्षण 2018 अतंर्गत देशातील विविध राज्यांच्या राजधानींचं सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणात मुंबई महापालिकेने प्रथम क्रमांक पटकवला आहे.


आणि कचऱ्याचं प्रमाण कमी झालं

केंद्र सरकारने स्वच्छतेसंदर्भात घालुन दिलेल्या नियमांचं पालन करत मुंबई महापालिकेने योजना राबवल्या. याचसोबत कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र आयोजित करण्यात आली. इतकेचं नव्हे तर घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यावर भर दिला. आणि तीन हजार 314 सार्वजनिक ठिकाणच्या कचरा संकलन केंद्रांची संख्या 941 पर्यंत खाली आणली. सोसायट्यांसह अनेक ठिकाणी ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारे प्रकल्प सुरू केले. याचसोबत मोठमोठे रेस्टोरंट, हॉटेल आणि मॉल असलेल्या परिसरात कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारे प्रकल्प उभारण्यावर पालिकेने भर दिल्याने कचऱ्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झालं.

कुठेही कचरा आढळल्यास त्यासंदर्भातील तक्रार नागरिकांना करता यावी आणि त्याचं त्वरित निवारण व्हावं याकरता महापालिकेनं अॅप सुरू केलं. आणि हे अॅप केंद्र सरकारच्या स्वच्छता अॅपला संलग्न करण्यात आलं.


पालिकेने राबवले हेही उपक्रम

एक हजार 690 सामुदायिक शौचालये
898 पे अँड युज शौचालये उभारली
एक हजार 941 वैयक्तिक शौचालये बांधली
वर्षभरात 940 फिरती शौचालयेही उपलब्ध करून दिली
टॉयलेट रेटिंग मशीन बसवले


हेही वाचा - 

महापालिका कामगारांसह अक्षय म्हणणार थँक्यू मुंबई

ना सरकार, ना प्रशासन.. त्यानेच सुरू केली स्वच्छता मोहीम!

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा