Advertisement

महापालिका कामगारांसह अक्षय म्हणणार थँक्यू मुंबई

महापालिकेच्या सफाई कामगारांसह अक्षय कुमार मुंबईकरांना थँक्यू म्हणणार आहे. मुंबईतील स्वच्छतेची पाहणी करायला केंद्रीय समिती आली आहे. या पाहणीनंतर स्वच्छतेच्या आधारे शहराची क्रमवारी ठरवण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच महापालिका मुंबईकरांचे आभार मानायला निघाली आहे.

महापालिका कामगारांसह अक्षय म्हणणार थँक्यू मुंबई
SHARES

मुंबईत राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेत भाग घेऊन मुंबई स्वच्छ राखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व मुंबईकरांचे महापालिका आभार मानणार आहे. यासाठी खुद्द चित्रपट अभिनेता अक्षय कुमार यांनी महापालिकेला सहकार्य करण्याचे ठरवलं असून महापालिकेच्या सफाई कामगारांसह तो संपूर्ण मुंबईकरांना थँक्यू म्हणणार आहे. मुंबईतील स्वच्छतेची पाहणी करायला केंद्रीय समिती आली आहे. या पाहणीनंतर स्वच्छतेच्या आधारे शहराची क्रमवारी ठरवण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच महापालिका मुंबईकरांचे आभार मानायला निघाली आहे.


फिल्मद्वारे जनजागृती

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ओल्या व सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईत ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. मध्यंतरी महापालिका कर्मचाऱ्यांनी 'वंदे मातरम्'म्हणत स्वच्छतेचा संदेश दिला होता. तर यंदा अभिनेता अक्षय कुमारचा सहभाग असलेली विशेष फिल्म जनजागृतीसाठी तयार करण्यात आली आहे. शनिवारी या फिल्मचं शुटींग पूर्ण झालं असून बुधवारपर्यंत या फिल्मचं काम पूर्ण होणार आहे. चित्रपटगृह, सोशल मीडिया तसेच वृत्तपत्र आदींच्या माध्यमातून ही जनजागृती केली जाणार आहे.


चांगला प्रतिसाद

'थँक्यू मुंबईकर' या नावाने फिल्म बनवण्यात आली आहे. यात महापालिका कामगारांसह अक्षय कुमार मुंबईकरांना थँक्यू म्हणणार आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून याला अधिक प्रतिसाद मिळत असल्याचं घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा