Advertisement

ना सरकार, ना प्रशासन.. त्यानेच सुरू केली स्वच्छता मोहीम!


ना सरकार, ना प्रशासन.. त्यानेच सुरू केली स्वच्छता मोहीम!
SHARES

हातात झाडू, ग्लव्ह्ज आणि तोंडावर मास्क...राहणीमान अगदी साधं...रोजचा दिनक्रम ठरलेला... हातात झाडू घ्यायचा आणि आसपासचा परिसर स्वच्छ करायचा. तुम्हाला वाटत असेल मी एखाद्या साफ-सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याबद्दल सांगतेय. पण तो साफ-सफाई कर्मचारी नाही, तर तुमच्या-आमच्यासारखा एक सामान्य मुंबईकर आहे. ज्याचं स्वप्न आहे मुंबईला पाहून खऱ्या अर्थानं वाटलं पाहिजे की 'आमची मुंबई ही स्वच्छ मुंबई आहे'. या अवलियाचं नावं आहे अरुण नांगुर्डे.



अरुण नांगुर्डे हे घाटकोपरच्या भटवाडीत राहतात. रोज सकाळी उठायचं, घरची कामं आवरली की झाडू उचलायचा आणि आसपासचा परिसर स्वच्छ करायचा. अरुण यांचा हा दिनक्रम ठरलेला. अरुणजी, तुम्हाला कधी घाटकोपर स्टेशनबाहेर झाडू मारताना दिसतील. तर कधी मेट्रो स्टेशनबाहेर कचरा उचलताना किंवा कधी स्टेशनवर लोकांनी गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी लाल केलेली जागा स्वच्छ करताना दिसतील.


चार वर्षांपासून मी साफ सफाईच्या कामाला सुरुवात केली. सुरुवातीला मी भटवाडीपासूनच साफ-सफाई करायला लागलो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानानंतर मी कामाचा विस्तार वाढवलाप्रत्येकानं आपापला परिसर स्वच्छ ठेवला तर कुठल्याच शहराला अस्वच्छ हा टॅग लागणार नाही. पालिका, शासन यांच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपण परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

अरुण नांगुर्डेस्वच्छता दूत


मुळात अरुण नांगुर्डे यांना पूर्वीपासून साफ-सफाईची आवड आहे. अरुण यांच्यानुसार, अनेक परदेशी नागरिक भारतात येतात. पण इथली अस्वच्छता पाहून नाकं मुरडतात. त्यामुळे भारताची प्रतिमा मलीन होते. त्यांनी जागोजागी जाऊन साफ-सफाई करण्याचा वसा उचलला आहे. फक्त चमकोगिरी न करता त्यांनी नित्यनियमाने आपली समाजसेवा चालू ठेवली आहे. अरुण नांगुर्डे यांचं काम पाहून अंधेरीतल्या जागृतीनगर मेट्रोतर्फे मेडल देऊन त्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे.




टेट्रा पॅकचं 'कागदी' फर्निचर!


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या थाटामाटात स्वच्छता अभियान सुरू केलं. त्यानंतर कितीतरी दिवस नेत्यांनी हातात झाडू घेऊन चमकोगिरी केली. नेत्यांच्या पाठोपाठ मुंबईकरांनी देखील काही महिने काय तो दिखावा केला. पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे, अशी खंत देखील अरुण नांगुर्डे यांनी व्यक्त केली. आज देखील कितीतरी मुंबईकर कचरा रस्त्यावरच टाकतात. रेल्वे ट्रॅक, रस्त्यांवर किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी सर्रास कचरा टाकला जातो, याचं दु:ख वाटत असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

संत गाडगेबाबांनी सुरू केलेल्या स्वच्छतेच्या कामाला अरुण नांगुर्डे यांच्यासारख्या मुंबईकरांमुळे पाठबळ मिळत आहे. शासनासोबतच इतर मुंबईकरांनी देखील त्यांना पाठिंबा देणं आवश्यक आहे. जर अरुण नांगुर्डे यांना हातभार लावायला शक्य नसेल तर निदान मुंबई अस्वच्छ तरी करू नका. पण तरीही मुंबईकरांचीसाथ असेल तर एकदिवस 'आमची मुंबई स्वच्छ मुंबई' हे स्वप्न पूर्ण होईल, याची अरुण नांगुर्डे यांना खात्री आहे.  



हेही वाचा

...नाहीतर 26 जुलैची पुनरावृत्ती होईल


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा