'आता, तुमचा कचरा तुम्हीच उचला'


SHARE

'स्वच्छता हीच सेवा' या मोहिमेअंतर्गत जी/ उत्तर विभागातील विविध गृहनिर्माण सोसायटीतील खत निर्मिती प्रकल्पाचे २ ऑक्टोबरला महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.या उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात जी/ उत्तर विभागाच्या कार्यालयाच्या आवारातील १०० किलो क्षमतेच्या बायोमिथेनायझेशन प्रकल्पाच्या उद्घाटनाने करण्यात आली. त्यानंतर महापौर निवासात 50 किलो क्षमतेच्या ऑरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टर सयंत्रणाचे उद्घाटन महापौर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महापौरांनी 'माझा कचरा माझी जबाबदारी' या महापालिकेच्या प्रकल्पाला बळकटी देण्याच्या दृष्टीने तामाम मुंबईकरांना मोलाचा संदेश दिला. प्रत्येक मुंबईकरांनी आपली जबाबदारी ओळखली, तर मुंबई स्वच्छ सुंदर होईल. या प्रकल्पाला अनुसरून जी/ उत्तर विभागात उत्तम प्रकारे काम सुरू असल्याने रहिवासी तसेच कर्मचारी यांचे कौतुक यावेळी महापौर यांनी केले.महापालिका आयुक्तांनी २ ऑक्टोबरपर्यंत बल्क जनरेटर्सना त्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट त्यांनीच लावण्यासंबंधी दिलेल्या अंतिम मुदतीला अनुसरून जी/ उत्तर विभागातील पुढील गृहनिर्माण सोसायटीमधील प्रकल्पाचे उद्घाटन महापौर यांच्या हस्ते करण्यात आले.

यामध्ये दादर, माहिमधील ६ सोसायट्यांचा समावेश होता. यापूर्वी ज्या सोसायटीच्या सदस्यांनी या खतनिर्मिती प्रकल्पाला सुरुवात केली, त्यांचे यावेळी महापौर यांनी अभिनंदन केले. यावेळी जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार उपस्थित होते.हेही वाचा - 

बायोमेडिकल वेस्ट फेकतात उघड्यावर : महापौरांचे चौकशीचे आदेश


संबंधित विषय